पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
मूलभूत कलागुणांचा विकासच महत्वाचा कवी अजय कांडर यांचे कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात प्रतिपादन फॅशन शो - नृत्य  - गाणी यांनी दणाणले सभागृह कणकवली /प्रतिनिधी    विद्यार्थीदशेत मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला तर भविष्य त्यांचं उज्वल असतं. माणसांचा मूलभूत कला विकास महत्त्वाचा असून त्या कलागुणांच्या विकासावर कलावंत जागतिक पातळीवर यश मिळू शकतो. यासाठी मात्र जिद्द - परिश्रम आणि आपल्यातील कलागुणांचे मोल कळायला हवे तरच मोठे यश मिळू शकते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी कणकवली येथे केले   कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगचा वार्षिक स्नेहमेळावा कवी अजय कांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली निलायम ब्लू थिएटरच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना कवी कांडर यांनी फॅशन डिझाईन या क्षेत्रामध्ये मोठ्या संधी असून आता खेडेगावांमधूनही या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करता येते. मात्र यासाठी आपल्यातील संकोचितपणा सोडायला हवा. कोणत्याही धाडसानेच जग जिंकता येते. ही जिद्द नव्या पिढीने बाळगली पाहिजे तरच मोठे यश शक्...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे राज्यस्तरीय निमंत्रितांची खासदार चषक शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन. कणकवली प्रतिनिधी नांदगाव युवा शूटिंग हॉलीबॉल मित्र मंडळ आयोजित नांदगाव शिवसेना पुरस्कृत खासदार चषक राज्यस्तरीय निमंत्रितांची  शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेत राज्यभरातून नामवंत संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे सलग तिसरे वर्ष असून या स्पर्धा नवीन वर्षानिमित्त  1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वा.स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खासदार विनायक राऊत तसेच शिवसेना नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत जिल्हास्तरीय खुली लघुचित्रपट स्पर्धा स्पर्धेत सहभागी होण्याचे करण्यात आले आहे आवाहन सिंधुदुर्ग |ऋषिकेश मोरजकर  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय खुली लघुचित्रपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  स्पर्धेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे- या स्पर्धेत सहभागी स्पर्धकानी लघुचित्रपटाची निर्मिती स्वत: केलेली असावी.२. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पाश्वसंगित, गीत, चित्रिकरण स्वता केलेले असावे.३. अगोदर प्रकाशीत झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकिय विभाग त्यांनी त्याच्या कामाकरीता तयार केलेले सादर करण्यात येऊ नयेत. ४. लघुचित्रपट निर्मिती करीता वापरण्यात आलेले साहित्य प्रोफेशनल दर्जाचे व उत्तम असावे, ५. लघुचित्रपट निर्मिती करीता वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावनारे नसावे. ६. या स्पर्धेकरीता जमा करण्यात आलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र व निवडिचे अधिकार प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे असतील. लघुचित्रपटाचे विषय १. पाण्याचे शाश्वत स्रोत २. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती ३. जल सं...

सिंधुदुर्ग today

इमेज
कलाकार मानधन साठी नांदगाव येथे भरणार कलाकार मेळा. किशोर मोरजकर चॅरिटेबल  ट्रस्टच्या वतीने आयोजन.   कणकवली प्रतिनिधी  कलाकार मंडळी यांना पन्नास वर्षे पूर्ण झाली की वृद्ध कलाकार मानधन हे शासन स्तरावरून मिळते . यामध्ये पेटी वादन, तबला वादन तसेच मूर्तिकार, दशावतार कला अशा विविध कलांसाठी सदर मानधन शासनाकडून दिले जाते.           मागील काही दिवसांपूर्वी किशोर मोरजकर ट्रस्टच्या वतीने नांदगाव येथील सर्व कलाकार व्यक्तींना सदर मानधन मिळवून देण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने जे कलाकार आहेत त्या आपल्या कलाकारांनी या कला महोत्सव मध्ये आपली कला सादर करावी कला सादर केल्यानंतर त्यांना मान्यवरांच्या हस्ते त्याच ठिकाणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. आणि हे प्रमाणपत्र त्यांना वृद्ध कलाकार मानधन प्रस्ताव सादर करण्यासाठी  उपयुक्त ठरणार आहे. तरी नांदगाव येथील वरील कलाकार मंडळींनी लवकरच किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव येथे आपल्या नावाची नाव नोंदणी येत्या 30 डिसेंबर 2023 पूर्वी करावी .असे आवाहन ट्रस्ट...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग today डिजिटल न्यूज चॅनल च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात नांदगाव प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनलच्या व्दितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून 2024 ची आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन आज उत्साहात संपन्न झाले आहे.         यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, सिंधुदुर्ग टुडे चे संपादक ऋषिकेश मोरजकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पपी सापळे आदी बहुसंख्येने रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच  ग्रामस्थ उपस्थित होते. दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाल्यानंतर दिनदर्शिका सर्वांना मोफत वाटप करण्यात आली आहे.यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

सिंधुदुर्ग today

इमेज
  मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या हस्ते १३ जानेवारी रोजी गिरगाव साहित्य संघात मातोंडकर यांचा गौरव. ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांची प्रमुख उपस्थिती कणकवली/प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य- सांस्कृतिक - सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कवी मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकदा कल्चरल अकामीचा महात्मा ज्योतिबा फुले स्मृती सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. 13 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या एकता कल्चरल महोत्सवात श्री मातोंडकर यांना सदर पुरस्काराने ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.यासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी काम पाहिले.        एकता कल्चरल मुंबई संस्था गेली पस्तीस वर्षे संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य कला संगीत नृत्य अभिनय या क्षेत्रातील गुणवंत कलाकारांना गौरवित असते. यात निष्ठेने सांस्क...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव उर्दू प्राथमिक शाळेत अल्पसंख्याक हक्क दिन साजरा. नांदगाव प्रतिनिधी नांदगाव उर्दू प्राथमिक शाळेत १८डिसेबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.   अल्पसंख्याक आयोगाचे परिपत्रक नुसार नांदगाव येथील उर्दू प्राथमिक शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आली ४ते ७वी पर्यंत च्या विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता   या स्पर्धेत भाग घेतलेल्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे.   प्रथम क्रमांक आरहान सिराज बटवाले ,द्वितीय क्रमांक महंमद आरहान मुश्ताक कितुर ,तिसरा क्रमांक आसफिया मुश्ताक बोबडे यांचा सत्कार नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले व निसार काझी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला   या वेळी अल्पसंख्याक हक्क दिन हा शासनाचा कार्यक्रम असून अल्पसंख्याक हक्क दिना निमित्त विचार मांडले व हक्क काय आहे  हे सांगितले आहे.   या वेळी नांदगाव उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक मुश्ताक कितुर सर तसमिया बटवाले फिझा नावलेकर उपस्थित होते.    या वेळी आलेल्या मान्यवरांचे पूषपगुछ देऊन स्वागत करण...