पोस्ट्स

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून महिलांना टेलर साहित्य वाटप. शिलाई मशीन दिलेल्या लाभार्थ्यांना टेलर साहित्याचा लाभ. ◼️सिंधुदुर्ग न्यूज: प्रतिनिधी      मानव साधन विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग , किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव या परिवर्तन केंद्र अंतर्गत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण CSR निधीतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी मागील वर्षी 10 महीलांना शिलाई मशीनचा लाभ समन्वयक संस्था किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या सहकार्याने नांदगाव येथील महीलांना देण्यात आला होता.       आता याच महीलांना सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण CSR निधीतून कात्री,मेजर टेप ,टेलर लाकडी मोजमापे पट्टी,रिळ , बॉबीन , रिंग केस, टेलर खडू , मशिन सुई आदी  महीलांचे साहीत्य नांदगाव येथील परिवर्तन केंद्र असलेल्या किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या सुपूर्द करण्यात आले होते. याचे आज वितरण करण्यात आले आहे यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, किशोर मोरजकर चॅरिट...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  ओबीसी महामंडळ थकीत कर्ज लाभार्थ्यांनी 50 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा. सिंधुदुर्ग Today न्यूज  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची उप कंपनी शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ लिमिटेड सिंधुदुर्ग यांच्यामार्फत विविध कर्ज योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारांकरिता अल्प व्याजदरामध्ये कर्ज वितरित करण्यात आलेले आहे.         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एक रकमी भरणा करण्याचा लाभार्थ्यांस थकीत व्याजदर रकमेत 50 टक्के सवलत देण्या बाबतची एक रकमी परतावा ओ.टी.एस. योजना दिनांक 31 . 3 . 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे .त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन सहकार्य करावे . असे आवाहन ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून  नांदगाव येथील रस्त्याचे भूमिपूजन  नांदगाव प्रतिनिधी  आ.श्री. नितेश राणेंच्या माध्यमातून जिल्हा नियोजनाच्या जन सुविधा अंतर्गत मंजूर झालेल्या नांदगाव पावाचीवाडी रस्त्याचे  कणकवली भाजपा तालुकाअध्यक्ष श्री मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ  वाढवून  भुमिपूजन  करण्यात आले.        यावेळी उपस्थित कणकवली तालुका महिला तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके, कणकवली  खरेदी विक्री संघ संचालक श्री पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर बूथ अध्यक्ष कमलेश पाटील, नांदगाव ग्रा.पं. सदस्य विठोबा कांदळकर, संतोष जाधव, वाळके सर, तंटामुक्ती अध्यक्ष रज्जाक बटवाले, वाडीतील सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  कलाकार जगला तरच कला टिकेल. सिंधुदुर्ग Today न्यूज मालवण तालुक्यातील, माळगांव गावात,(मधली वाडी)  दशावतार कलावंत कु.विराज भिवा माळगांवकर हा तरुण राहतो.मुळात कलेवर नितांत प्रेम करणारा हा कलाकार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी सामना करत आहे. त्याचे वडील वयोवृद्ध असल्याने घरीच असतात. त्याचबरोबर त्याची आई अर्धांगवायूचा झटका आल्याने ती अंथरुणाला खिळून आहे. हा उमदा तरुण दशावतार मध्ये काम करत आहे.त्याचबरोबर गणपती मुर्त्या बनवतो.याच दोन गोष्टींवर त्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे  पण त्याच्या एकट्याच्या कमाईत आईचे आजारपण, घर खर्च पुर्ण होत नाही.आर्थिक झळ सोसावी लागते आहे.आणि अशातच त्याच्यावर घररुपी संकट कोसळले आहे.मातीचे जुने घर असल्याने त्याच्या भींती कोसळायला आल्या आहेत.शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित आहे.त्यानी आपल्याला घर मिळावे म्हणून  घरासाठी ग्रामपंचायत कडे विनवणीपुर्वक मागणी केली आहे.जवळपास तीन वर्षे होऊन गेली अजुन काही घर मिळाले नाही.दुर्देव म्हणावं लागेल.विराज आपली कला जोपासत आहे.या कलाकारांला लवकरात लवकरच घरकुल मिळावे.ही परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहोत.आम्ही त्यासाठी प...

सिंधुदुर्ग Today डिजिटल न्यूज

इमेज
  कासार्डे विद्यालयातील २९ कराटे खेळाडूंचे बेल्ट परीक्षेत अभिनंदनीय यश... तीन खेळाडू ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी पात्र तळेरे : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा गेन्श्युरियो कराटे  असोसिएशन - आयडियल ज्युडो कराटे जिल्हा असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या वतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयातील 'कुतरकर नाट्यगृहात 'आयोजित इंडियन गेन्श्युरियो कराटे फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील 29  खेळाडूंनी  अभिनंदनीय यश संपादन केले आहे.    कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात सन.१९९७ पासून ज्युदो कराटे प्रशिक्षक तथा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व त्यांच्या आनेक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सलग २६ वर्षे मोफत ज्यूदो व कराटे वर्ग सुरु आहे.     या वर्षी बेल्टग्रेडेशन परीक्षेसाठी बसलेले काही खेळाडू ५ ते ६ वर्षापासून तर काही खेळाडू २ वर्षापासून कराटे कलेचे धडे गिरवत आहेत.     यशस्वी खेळाडू व  यश संपादन केलेला कलर बेल्ट पुढीलप्रमाणे - ब्ल्यू बेल्ट-  ...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव  पावाचीवाडी येथील महापुरुष क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 2 मे पासून विविध कार्यक्रम. 4 मे रोजी भजनाचा जंगी सामना बुवा भगवान लोकरे × बुवा प्रमोद हर्याण कणकवली/प्रतिनिधी नांदगाव  पावाचीवाडी येथील महापुरुष क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने 2 ते 4 मे या कालावधीत  विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.        महापुरुष क्रिडा व सांस्कृतिक मंडळ पावाचीवाडी नांदगाव च्या वतीने नूतन मंदिर उद्घाटन कार्यक्रम 2मे, 3मे व 4मे 2023 या दिवशी अनेक   कार्यक्रमांनी  साजरा होणार आहे.त्यात समाज उपयोगी उपक्रम ही राबविण्यात येत आहे.यामधे  रक्तदान शिबीर मंगळवार दि. 2/5/23 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. रक्तदान करणा-या दात्याला आकर्षक भेट वस्तू दिली जाईल. तरी जास्तीत जास्त  रक्तदात्यांनी या कार्यक्रमात सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन महापुरुष क्रिडा व सांस्कृतिक मंडळ पावाचीवाडीच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील बुधवार दि. 3 मे रोजी सकाळी 8.30 वाजता होम-हवन , दुपारी 12  व...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या संस्थेच्या परीवर्तन केंद्रात समावेश शिलाई मशीन चा लाभ दिलेल्या 10 महिलांना दोन दिवसांत टेलर साहित्याचे वितरण सिंधुदुर्ग न्यूज: प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या मानव साधन विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग संस्थेच्या परीवर्तन केंद्रात समावेश करण्यात आला आहे.      मानव साधन विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्र, नांदगाव अंतर्गत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सन्मा.सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण CSR निधीतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी मागील वर्षी 10 महीलांना शिलाई मशीनचा लाभ समन्वयक संस्था किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या सहकार्याने नांदगाव येथील महीलांना देण्यात आला होता.       आता याच महीलांना सन्मा.सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण CSR निधीतून कात्री,मेजर टेप ,टेल...