सिंधुदुर्ग today


नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर सकाळी भिषण अपघात 

अपघातात ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे निधन.

बहिण, भाऊ मुंबई ते सावंतवाडी करत होते प्रवास. 

नांदगाव / प्रतिनिधी 

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील मधल्या कठड्यावर कार आदळून भिषण अपघात झाला या अपघातात ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे मृत्यू झाला आहे.सदर अपघात आज सकाळी 7.30 च्या सुमारास नांदगाव येथे घडला. मुंबई हून सावंतवाडी च्या दिशेने जाणाऱ्या या वाहनाचा अपघात झाला. यात बहिणीचा मृत्यू झाला तर भाऊ जखमी झाले आहेत.

      अपघाताचा आवाज येताच आजुबाजूच्या ग्रामस्थांनी तसेच जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांनी मदतीसाठी धाव घेतली तसेच रुग्णवाहिकांना बोलविण्यात आली श्री. श्री. नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी महिलेला कणकवली येथे हलविण्यात आले परंतु त्यांचे कणकवली रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर दुसरा जखमी असलेला त्यांचाच भाऊ वैभव कृष्णा आसोलकर यांना नांदगाव केंद्राच्या रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्यातून चंद्रकांत झोरे यांनी अपघातस्थळी येत पंचायत केला. 

   नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर अपघातांची मालिका 

नांदगाव ओटव फाटा या स्पॉटला अपघातातांची मालीका सुरुच आहे. व मधल्याच एकाच ठिकाणी कठड्यावर आढळून अपघात होत आहेत. व हकनाक बळी जात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today