पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा. समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी डॉ दीपक पवार यांचे प्रतिपादन. कणकवली/प्रतिनिधी     आपली भाषा संपली तर आपणही संपणार आहोत हे ज्यांना माहित नाही तेच लोक भाषेच्या प्रश्नापासून दूर राहत आहेत. भाषा संपली तर साहित्य संपेलच परंतु आपल्या भाषेची संस्कृती संपून आपणही संपून जाऊ. यामुळे मराठी भाषेच्या प्रश्नाशी सर्व मराठी समाज जोडला जायला हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा अभ्यास दीपक पवार यांनी येथे केले.    समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वसई येथे यावर्षीचे पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम कलमठ गोसावीवाडी अक्षय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त, समीक्षक प्रा.संजीवनी पाटील यांच्या हस्ते प्रा.पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ .पवार यांनी भाषेच्या प्रश्नाशी सर्व साह...

सिंधुदुर्ग today

इमेज
  शाळा तिथे दाखला उपक्रमा अंतर्गत ४ हजार दाखल्यांचे वाटप. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शाळा तिथे दाखला हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत सेवा पंधरावडाच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील २५८ शाळांमध्ये वय अधिवास व जातीचा दाखला देण्याबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे. आतापर्यंत कणकवली तालुक्यात शाळा तिथे दाखला उपक्रमांतर्गत १० हजार अर्ज आले आले असून, आतापर्यंत ४ हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.  सेवा पंधरावडा या अंतर्गत प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून शाळा तिथे दाखला हा उपक्रम हाती घेण्यात आला.  कणकवली तालुक्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी श्री. देशपांडे यांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र संचालक व सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे तालुक्यातील शाळांचे जबाबदारी सोपविण्यात आली...

सिंधुदुर्ग today

इमेज
देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता. मत्स्य विकास मंत्री  नितेश राणे यांच्या मागणीला यश.   कृषि मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय ; कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन. सौंदाळे येथे साडेसात  हेक्टर वर उभारणार कॉलेज,दीडशे कोटीचा प्रस्ताव. मुंबई प्रतिनिधी  देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी कोकणच्या जनतेला नवे शैक्षणिक दालन निर्माण करून देण्याचा सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहेत.  या संदर्भात  26 ऑगस्ट रोजी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात बैठक झाली होती. यामध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे उपस्थित होते. या बैठकीच्या इतिवृत्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन...

सिंधुदुर्ग today

इमेज
नाम.नितेश राणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. रेल्वे बाबत विविध थांबा बाबत केली चर्चा.  मडगाव एक्सप्रेस कणकवली तर मांडवी एक्स्प्रेस नांदगाव येथे थांबा मिळण्याची मागणी.  सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)  दिल्ली येथे आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग व कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली. कोकणातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, सिंधुदुर्ग व परिसरातील स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, कोयंबतूर, नागरकोइल व मडगाव एक्सप्रेसचा कणकवली येथे थांबा, मांडवी एक्सप्रेसचा नांदगाव येथे थांबा, मडुरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या, पीआरएस काउंटर, प्रवासी सुविधा उन्नतीकरण तसेच वैभववाडी–कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी भेटीदरम्यान केली. मा. वैष्णव यांनी सदर मागण्या व प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्याची ग्वाही दिली.

सिंधुदुर्ग today

इमेज
'एआय सिंधुदुर्ग मॉडेल' चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास. ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेट. मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव.  सिंधुदुर्गनगरी दि. २३ (ऋषिकेश मोरजकर) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन येथे विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intelligence) आधारित मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी दिलेले प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे मॉडेल प्रभावीपणे विकसित होऊ शकले. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही मोठी झेप ठरणार आहे. मार्व्हल यांनी विकसित केलेले हे मॉडेल अत्यंत यशस्वी ठरले असून, लवकरच ते देशभरात स्वीकारले जाणार आहे. भारतातील पहिले असे 'एआय सिंधुदुर्ग मॉडेल' बनविण्याचा मान आपल्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
पिक विम्याची रक्कम दस-यापुर्वी शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी. ई पिक पाहणी ॲपमध्ये त्रुटी , प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची शेतक-यांची मागणी : असलदे रामेश्वर सोसायटी ६१ वी सर्वसाधारण सभा कणकवली दि.२२ सप्टेंबर: असलदे गावातील आंबा, काजु व विविध शेतक-यांना संबंधीत विमा कंपनीकडुन पिकविम्याची रक्कम दस-यापुर्वी जमा करण्यात यावी. तसेच पिक पाहणी नोंद करताना ई-पिक पाहणी अ‍ॅपमध्ये तांत्रिक त्रुटी येत आहेत. तसेच बागायतींच्या ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्यामुळे पिक नोंदणी होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जापासुन व पिकविम्यापासुन वंचित राहत आहेत. त्या त्रुटी महसुल विभागाने दुरुस्त कराव्यात, अशा मागण्या शेतक-यांनी सभेत केल्या. त्यावर शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन चेअरमन भगवान लोके यांनी दिले.  असलदे येथील ग्रामपंचायतच्या रामेश्वर सभागृहात रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची ६१ वी सर्वसाधारण सभा चेअरमन भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला  माजी चेअरमन प्रकाश परब , खरेदी विक्री संचालक पंढरी वायंगणकर , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर ...

सिंधुदुर्ग today

इमेज
आयनलच्या श्री देव नागेश्वर, पावणादेवी नवरात्रोत्सवास पार्टी १ परवानगी. अँड उमेश सावंत यांनी पाहिले काम. कणकवली / प्रतिनिधी आयनल येथील श्रीदेवीचा वार्षिक नवरात्रोत्सव साजरा करण्यास पार्टी नंबर १ चे सूर्यकांत अनंतराव साटम वगैरे पाच यांना कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. तसेच नवरात्रोत्सव साजरा करताना शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पार्टी नंबर 1 मधील प्रवीण साटम व पार्टी नंबर 2 यांना उत्सवात सहभागी होण्यास हरकत नसल्याचेही आदेशात नमूद केले आहे. पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड.उमेश सावंत यांनी काम पाहिले.  आयनल येथील श्री देव नागेश्वर पावणादेवी देवस्थान मध्ये पार्टी नंबर 1 चे सूर्यकांत साटम वगैरे पाच व पार्टी नंबर 2 चे संदेश सुशील साटम वगैरे सहा यांच्यात मानपानावरून वाद आहेत. यावरून दिवाणी दावे व अपिले चालू आहेत. त्यामुळे नवरात्र संदर्भात पोलीस निरीक्षक कणकवली यांच्या अहवालावरून हा नवरात्र उत्सव साजरा करण्यास दोन्ही पार्ट्यांना बंदी करण्याबाबतचा अहवाल कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याची सुनावणी कार्यकारी दंडाधिकारी श्री. ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे पडलेले हायवे खड्डे सरपंच भाई मोरजकर यांच्या इशाऱ्याने बुजविले.  सतत दोन दिवस दुचाकी खड्यात धडकून होत होता अपघात. हायवे रोखण्याचा दिला होता इशारा. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव केंद्र शाळा नंबर १ नजिक तेली यांच्या घरासमोर असलेल्या हायवे वरील खड्डयात दुचाकी आदळून गेल्या दोन महिन्यांपासून अपघात होत आहेत. यात पायांना गंभीरपणे दुखापती झाल्या आहेत. यामुळे आक्रमक झालेल्या नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी हायवे बंद करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.       काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास दुचाकी खड्यात धडकून अपघात झाला होता.  दुचाकीस्वाराला पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले. सतत दोन दिवस दुचाकी खड्यात धडकून अपघात होत असल्याने नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या सहीत ग्रामस्थ आक्रमक झाले हायवे प्राधिकरण उप अभियंता कुमावत यांनी ही नांदगाव आरोग्य केंद्र येथे येत माहिती घेतली.अपघातानंतर नांदगाव ग्रा...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांच्या ' बाया पाण्याशीच बोलतात' कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा. २८ रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजन. डॉ.रणधीर शिंदे, डॉ.रफिक सुरज,प्रा.एकनाथ पाटील, प्रा.संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग. कणकवली/प्रतिनिधी      मराठीतील नामवंत कवी अजय कांडर यांच्या मराठी साहित्यात बहुचर्चित ठरलेल्या  "बाया पाण्याशीच बोलतात" या कवितेचा रौप्यमहोत्सवी चर्चासत्र सोहळा रविवार २८ सप्टेंबर रोजी सायं.४ वा.इचलकरंजी येथील नाईट कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठान आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होत असून सुप्रसिद्ध समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून कवी, कादंबरीकार,समीक्षक प्रा.डॉ. रफिक सुरज, कवी, समीक्षक प्रा. एकनाथ पाटील आणि समीक्षक प्रा संजीवनी पाटील यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे आणि नाईट कॉलेजचे प्राचार्य विरूपाक्ष खानाज यां...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव केंद्र शाळा येथे 'शाळा तिथे दाखला' अंतर्गत दाखले वितरण. कणकवली प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शासनाच्या 'शाळा तिथे दाखला' या उपक्रमांतर्गत १७ सष्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दाखला पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने प्राप्त दाखल्यांचे आज नांदगाव येथील केंद्र शाळा नं.१ येथे वितरण करण्यात आले.       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,शिक्षक सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. सावंत, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत,पालक अशोक पाटील, शिक्षक वृंद प्रशांत सर्पे ,सौ.पोकळे, सौ.चव्हाण,सौ.वळंजू आदी उपस्थित होते.       यावेळी प्राप्त एकूण बारा दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सिंधुदुर्ग today

इमेज
सावधान... APK pdf फाईल चा सर्वत्र धुमाकूळ. बँक प्रमाणे लोगो असलेली APK pdf फाईल पासून सावध राहा.  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) फसवणूकीचे वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरले जात आहे. सावधान सध्या सर्वत्र एपीके पीडीएफ फाईल चा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. सर्व ग्रुप ना स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ इंडिया असे बनावट नावाचा सिम्बॉल वापरून व्हाट्सअप ग्रुप मधून एपीके फाईल सेंड होत आहे सदर एपीके फाईल ओपन करतात आपला मोबाईल व्हाट्सअप सर्व अकाउंट हॅक होतो. सध्या व्हाट्सअप गृप मधे सदर APK pdf फाईल फिरत आहे.            जो सदर फाईल ओपन करतो त्याचे मोबाईल व्हाट्सअप  अकाउंट हॅक होवून त्याच्या मोबाईल वर असलेल्या सर्व मेंबर तसेच गृप मधे त्यांच्याच मोबाईल वरुन सेंड केली जाते. काहींना वाटतं आपल्या मित्रानेच फाईल पाठवली आहे. तर ओपन करुन पहावी. म्हणून ओपन करतात परंतु सदर फाईल ओपन करताच काही तासांतच आपला मोबाईल हॅक होतो. ते त्याला समजून येत नाही. जेव्हा समोरुन फोन येतो  अरे बँक ची कसली माहिती पाठवली तु ... समोरुन म्हणतो मी पाठवली ? मी नाही पाठवली तेव्हा पाहतो तर काय आपल्या अकाउंट ...

सिंधुदुर्ग today

इमेज
आणि त्या ८९ आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य... सिंधुदुर्ग जिल्ह्यात  ८९ आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्नांना यश ;  ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद. सिंधुदुर्गनगरी  (ऋषिकेश मोरजकर)  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविका (महिला) या पदांसाठी झालेल्या पदभरतीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या प्रयत्नांना अंतिम रूप मिळाले. दि.17 सप्टेंबर 2025 रोजी ‘सेवा पंधरवडा अभियान’ अंतर्गत पालकमंत्री  नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हानियोजन समिती सभागृहात 89 आरोग्य सेविकांना नियुक्ती आदेशाचे वितरण झाले. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांवरील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून लसीकरण, माता-बाल संगोपन, आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना तसेच साथरोग नियंत्रण यांसारखे राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे. या संपूर्ण भरती प्रक्रि...

सिंधुदुर्ग today

इमेज
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा.  पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन. लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ.  देशात आणि राज्यात रयतेचे राज्य, प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन होते सुखकर. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते. तसे महायुतीचे सरकार काम करत असल्याची भावना जनमानसात  निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य म्हणून काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ज्या पद्धतीने नियोजनबद्ध काम करत आहे, त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील, जेव्हा मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाच्या राज्यस्तरावरील निकाल जाहीर केले जातील त्यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गला सन्मानाने आमंत्रित केले जाईल असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. ...

सिंधुदुर्ग today

इमेज
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवारा’मुळे महिलांचे आरोग्य सदृढ होईल! पालकमंत्री नितेश राणे यांना विश्वास ; कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन.  कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह््यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आपण सुरु करीत आहोत. या अभियानाकडे आपल्याला आरसा म्हणून पाहता येणार आहे. कारण आपल्या आरोग्य व्यवस्थेत आपण कुठे कमी पडतो, हे या निमित्ताने पहायला मिळणार आहे. म्हणूनच या अभियानाअंतर्गत ज्या तपासण्या, उपचार, विविध बाबी होणार आहेत, त्याच्या नोंदी ठेवा, जेणेकरून आपण कुठे कमी पडतो, हे देखील समजेल. सिंधुदुर्गात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. साहजिकच त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविल्यास जिल्ह्याचा विकास आणखीन सुखकर होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या शुभारंभप्र...

सिंधुदुर्ग today

इमेज
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी. राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना. कोकणच्या अर्थकारणाला मिळणार नवी दिशा; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. रत्नागिरी : प्रतिनिधी  मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्ग मधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेड विषयी देखील मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या तीन जेटीं मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी, दापोली तालुक्यातील उटंबर  तसेच सिंधुदुर्ग ज...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली मतदारसंघातील विविध विभागांची आढावा बैठक शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा  - राज्यमंत्री योगेश कदम योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा क्षेत्रीय भेटींना प्राधान्य द्या योजनांची जनजागृती करा सिंधुदुर्गनगरी, दि. १५ सप्टेंबर (जिमाका):- शासनाने नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. गावपातळीवर योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून गतीमान अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.             गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी आमदार निलेश राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, कणकवली उपवि...

सिंधुदुर्ग today

इमेज
  सावंतवाडी, कुडाळ मतदारसंघातील विविध विभागांची आढावा बैठक. घरकुल योजना प्रभावीपणे राबवा; सोलर प्रकल्प यशस्वी करा.    - राज्यमंत्री योगेश कदम प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा; महसूल व ई-कारभारावर लक्ष केंद्रित करा. मोफत धान्य वितरणात हयगय खपवून घेतली जाणार नाही. महसूल वसूलीला प्राधान्य द्या ; प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा सिंधुदुर्गनगरी, (ऋषिकेश मोरजकर)  - यावर्षी आपल्या राज्याने ३० लाख घरकुल मंजूर करुन घेतली आहेत. ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. विशेष म्हणजे घरकुलांच्या बांधकामासाठी पुरविल्या जाणाऱ्या वाळूमध्ये अनियमितता होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही, अशा लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांद्वारे जागा उपलब्ध करून द्यावी. पूर्ण झालेल्या प्रत्येक घरकुलावर सोलर लाईट बसविणे बंधनकारक असून जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर, अंगणवाड्यांवर, जिल्हा परिषद शाळांवर व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सोलर पॅनल्स बसविण्याचे निर्देश  गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश क...

सिंधुदुर्ग today

इमेज
ठाकर समाजाची पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली सदिच्छा भेट, समाजाचे प्रश्न सोडवल्याबद्दल मानले आभार. जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुढाकार ; मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत प्रलंबित प्रश्न मार्गी. समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक गरजांना चालना ; सहकार्य आणि पाठबळाबद्दल ठाकर समाज ऋणी. सिंधुदुर्ग ( ऋषिकेश मोरजकर)  मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करून समाजाच्या सुविधांबाबत असलेले अनेक मुद्दे सोडवल्याबद्दल नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले. या भेटीत ठाकर समाज अध्यक्ष शशांक आटक व पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी समाजासाठी जात वैधता पडताळणी मिळवून देण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल मंत्री राणे यांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यावर चर्चा करण्यात आली. भेटीला समाजातील पद्मश्री परशुराम गंगावणे, अध्यक्ष शशांक आटक, सचिव रुपेश गरुड, निलेश ठाकूर, वैभव ठाकूर, प्रवीण ठाकूर, अविनाश गरुड व अविराज मराठे उपस्थित ह...

सिंधुदुर्ग today

इमेज
भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा. पालकमंत्री नितेश राणेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.  सिंधुदुर्गनगरी  (ऋषिकेश मोरजकर) :-  पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील तसेच क्षेत्रीय तपासणीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची तसेच काळ्या यादीत (Black List) टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयास करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. पत्रव्यवहार करून देखील राज्यस्तरीय विमा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने पालकमंत्री नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सन २०२५-२६ करिता सदरच्या विमा कंपनी ऐवजी इतर विमा कंपनीची नियुक्ती करावी असे देखील पालकमंत्र्यांनी निर्देशित केले.           पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विमा कंपनीचे राज्यस्तरीय प्रतिनिधी, स्कायमेट व...

सिंधुदुर्ग today

इमेज
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग उबाठा पदाधिकारी यांनी घेतली मातोश्री वर सदिच्छा भेट. सिंधुदुर्ग /   प्रतिनिधी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे या सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्याक पदाधिकारी तसेच सिंधुदुर्ग उबाठा पदाधिकारी यांनी मातोश्री वर जात सदिच्छा भेट घेतली.      यावेळी माजी खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक, युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तसेच अल्पसंख्याक सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले,  जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवनकर, वैभववाडी अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, जिल्हा सरचिटणीस समीर लांजेकर ,नौशाद नाचरे , साकिब पाटणकर, सद्दाम लांजेकर, मुराद रामादुल ,इमाम नावळेकर, अजीम नावलेकर, सचिन लोके आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार. वेंगुर्ले : प्रतिनिधी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन स्तरावर काही समस्या, अडचणी  असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना शासन पातळीवर कोणत्याही अडचणी समस्या असतील तर त्या वेळीच सुटून त्यातून मार्ग निघावा. यासाठी पालकमंत्री नितेश राणे जनता दरबाराद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. यापूर्वी झालेल्या सर्व जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ना. नितेश राणे यांनी समोर आलेल्या अडचणी, समस्या त्या त्या विभागामार्फत सोडविल्या. तर काही समस्या जनता दरबारातच सुटल्या. वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांना अशा स्वरूपात काही समस्या किंवा अडचणी असल्या तर त्यांनी उद्या होण...

सिंधुदुर्ग today

इमेज
दीप तारांगण क्रियेशन्सचे नाट्य- चित्रपट, साहित्य, चळवळ पुरस्कार जाहीर  पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार अभिनेत्री शुभांगी भुजबळ, लेखक भाऊ पाध्ये पुरस्कार कवी सायमन मार्टिन तर गोपाळराव दुखंडे पुरस्कार मधुकर मातोंडकर यांना जाहीर अकरा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप कणकवली/प्रतिनिधी     तळकोकणातील नाट्यकर्मीनी एकत्र येत नाटक - चित्रपट, साहित्य आणि चळवळ यांच्यासाठी पुरस्कार योजना यावर्षीपासून चालू केली आहे. दीप तारांगण क्रियेशन्स या संस्थेतर्फे हे पुरस्कार घोषित करण्यात आले असून नाट्य आणि चित्रपट या विभागात देण्यात येणारा पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार विचारशील अभिनेत्री शुभांगी भुजबळ (मुंबई) यांना तर साहित्य विभागात देण्यात येणारा ज्येष्ठ लेखक भाऊ पाध्ये पुरस्कार ज्येष्ठ कवी तथा सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन (वसई) आणि साहित्य सांस्कृतिक सामाजिक चळवळ विभागात देण्यात येणारा गोपाळराव दुखंडे पुरस्कार ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर (सिंधुदुर्ग) यांना जाहीर करण्यात आला आहे. 11000 (अकरा हजार) रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्कारा...

सिंधुदुर्ग today

इमेज
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भेट घेत प्रकृतीची केली चौकशी मुंबई  माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील अधिश  निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते.  बरे होऊन रुग्णालयातून घरी अधिश निवासस्थानी परतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव येथे आशिकाना मुस्तफा सिरत कमीटीच्या वतीने रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. कणकवली प्रतिनिधी  नांदगाव येथे आशिकाने मुस्तफा सिरत कमेटि च्या वतीने ईद ए मिलादुननबिजलसा मुबारक आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न         नांदगाव येथे आशिकाने मुस्तफा सिरत कमेटि च्या वतीने ईद ए मिलादुननबिजलसा मुबारक आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर व दहावी ,बारावी उत्तीर्ण विद्यार्थी चे सत्कार मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.       यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , कासार्डे बिट अंमलदार चंद्रकांत झोरे ,  पोलीस स्वप्निल जाधव , नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर,  अल्पसंख्याक समाज कणकवली तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले,  ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले ,  डॉ बुआ,  सिरत कमेटी अध्यक्ष आलिम बटवाले, उपाध्यक्ष दिलावर साटविलकर, आसिफ बटवाले , शकिल बटवाले ,माजी सैनिक गफार बटवाले मोसिम बटवाले आदी मान्यवर उपस्थित होते    या वेळी मान्यवर , पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन. संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा "कणकवलीचा राजा", व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे घेतले दर्शन. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा "कणकवलीचा राजा", व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक व अधिकारी व संतांच्या गणपतीचे मानकरी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले.  पालकमंत्री नितेश राणे यांनी  या सार्वजनिक गणपती सह स्थानिक घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.सांगवे केनेडी,भिरवंडे येथे घरोघरी श्री गणेशाचे दर्शन घेतले.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.तर कणकवली येथे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आणि रिक्षा संघटना अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्ष बंडू हरणे, महेश सावंत, संजय मालडकर, अभय राणे,रिक्षा गणेश उत्सव समिती अध्यक्ष...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर  घरगुती श्री गणेशाचे घेणार दर्शन कणकवली प्रतिनिधी  राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी नांदगाव पोलीस पाटील यांच्या गणपती बाप्पा चे घेतले दर्शन. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेल्या गणपती बाप्पा चे आज कणकवली नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दर्शन घेतले. यावेळी पोलीस पाटील मोरजकर कुटुंबियांनी यथोचित शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.       यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, गोपनीय पोलीस सागर जाधव, श्री बावधाने, मकरंद माने , पत्रकार, विलास मोरजकर, राजेंद्र मोरजकर,ऋषिकेश मोरजकर, पोलीस पाटील वृषाली मोरजकर, कमलाकर महाडिक, मारुती मोरये आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  कवी सफरअली इसफ यांचा पुरस्काराने गौरव करताना विशाल भोसले.बाजूला इतर मान्यवर.  कवी सफरअली इसफ यांना सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार. चिपळूण येथे पुरस्काराचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण. कणकवली/ प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहासाठी 'सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार' प्राप्त झाला असून चिपळूण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर काव्य पुरस्काराने कवी इसफ यांचा गौरविण्यात आला.     चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृह येथे चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सह्याद्री समाचारतर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कादंबरीकार प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, कवी भालचंद्र सुपेकर, सह्याद्री समाचारचे प्रमुख शाहिर शाहिद खेरटकर, माजी सैनिक संतोष मोहिते, प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. गोपीचंद वाघमारे आदी उपस्थित होते.कवी सफरअली इसफ यांचा अल...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरा. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)      दरवर्षी प्रमाणे यंदाही नांदगाव येथे ईद ए मिलादजलसा मुबारक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी नांदगाव मस्जिद येथून मिरवणूक  काढण्यात आली या वेळी " नारे तकबिर अलाहो अकबर ; नारे रीसालत या रसुलुला; ईद ए मिलादजलसा मुबारक; हिंदुस्तान झिंदाबाद असे घोषणा देण्यात आल्या.    या पैगंबर जन्म दिनानिमित्त मुस्लिम मोहलयात प्रत्येक घरात विद्युत रोषणाई करण्यात आली या मिरवणुकीत प्रत्येकाने सरबत; सिरखुरमा ; लाडु; मिठाई; पाणी बाॅटल ; समुसे;वडा असे अनेक पदार्थ पैगंबर जन्म दिनानिमित्त वाटण्यात आले संपुर्ण मुस्लिम मोहला आनंदाने ईद ए मिलादजलसा साजरा करण्यात आला या निमित्ताने कणकवली पोलिस निरीक्षक नलावडे , पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे,कासार्डे  बिट चे झोरे ,  बावधाने, जाधव , यांचा मुस्लिम समाजातर्फे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला    मिरवणूक नांदगाव तिठा येथे येऊन सांगता करण्यात आली या वेळी संपुर्ण मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते