सिंधुदुर्ग today
आयनलच्या श्री देव नागेश्वर, पावणादेवी नवरात्रोत्सवास पार्टी १ परवानगी.
अँड उमेश सावंत यांनी पाहिले काम.
कणकवली / प्रतिनिधी
आयनल येथील श्रीदेवीचा वार्षिक नवरात्रोत्सव साजरा करण्यास पार्टी नंबर १ चे सूर्यकांत अनंतराव साटम वगैरे पाच यांना कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. तसेच नवरात्रोत्सव साजरा करताना शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पार्टी नंबर 1 मधील प्रवीण साटम व पार्टी नंबर 2 यांना उत्सवात सहभागी होण्यास हरकत नसल्याचेही आदेशात नमूद केले आहे. पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड.उमेश सावंत यांनी काम पाहिले.
आयनल येथील श्री देव नागेश्वर पावणादेवी देवस्थान मध्ये पार्टी नंबर 1 चे सूर्यकांत साटम वगैरे पाच व पार्टी नंबर 2 चे संदेश सुशील साटम वगैरे सहा यांच्यात मानपानावरून वाद आहेत. यावरून दिवाणी दावे व अपिले चालू आहेत.
त्यामुळे नवरात्र संदर्भात पोलीस निरीक्षक कणकवली यांच्या अहवालावरून हा नवरात्र उत्सव साजरा करण्यास दोन्ही पार्ट्यांना बंदी करण्याबाबतचा अहवाल कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याची सुनावणी कार्यकारी दंडाधिकारी श्री. देशपांडे यांच्यासमोर झाली. या सुनावणीत करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर पार्टी नंबर 1 ला दिनांक 22 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा