सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे ईद ए मिलाद उत्साहात साजरा.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
दरवर्षी प्रमाणे यंदाही नांदगाव येथे ईद ए मिलादजलसा मुबारक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी नांदगाव मस्जिद येथून मिरवणूक काढण्यात आली या वेळी " नारे तकबिर अलाहो अकबर ; नारे रीसालत या रसुलुला; ईद ए मिलादजलसा मुबारक; हिंदुस्तान झिंदाबाद असे घोषणा देण्यात आल्या.
या पैगंबर जन्म दिनानिमित्त मुस्लिम मोहलयात प्रत्येक घरात विद्युत रोषणाई करण्यात आली या मिरवणुकीत प्रत्येकाने सरबत; सिरखुरमा ; लाडु; मिठाई; पाणी बाॅटल ; समुसे;वडा असे अनेक पदार्थ पैगंबर जन्म दिनानिमित्त वाटण्यात आले संपुर्ण मुस्लिम मोहला आनंदाने ईद ए मिलादजलसा साजरा करण्यात आला या निमित्ताने कणकवली पोलिस निरीक्षक नलावडे , पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे,कासार्डे बिट चे झोरे , बावधाने, जाधव , यांचा मुस्लिम समाजातर्फे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
मिरवणूक नांदगाव तिठा येथे येऊन सांगता करण्यात आली या वेळी संपुर्ण मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा