सिंधुदुर्ग today
नांदगाव केंद्र शाळा येथे 'शाळा तिथे दाखला' अंतर्गत दाखले वितरण.
कणकवली प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शासनाच्या 'शाळा तिथे दाखला' या उपक्रमांतर्गत १७ सष्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दाखला पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने प्राप्त दाखल्यांचे आज नांदगाव येथील केंद्र शाळा नं.१ येथे वितरण करण्यात आले.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,शिक्षक सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये, ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. सावंत, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत,पालक अशोक पाटील, शिक्षक वृंद प्रशांत सर्पे ,सौ.पोकळे, सौ.चव्हाण,सौ.वळंजू आदी उपस्थित होते.
यावेळी प्राप्त एकूण बारा दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा