सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे पडलेले हायवे खड्डे सरपंच भाई मोरजकर यांच्या इशाऱ्याने बुजविले. 

सतत दोन दिवस दुचाकी खड्यात धडकून होत होता अपघात.

हायवे रोखण्याचा दिला होता इशारा.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव केंद्र शाळा नंबर १ नजिक तेली यांच्या घरासमोर असलेल्या हायवे वरील खड्डयात दुचाकी आदळून गेल्या दोन महिन्यांपासून अपघात होत आहेत. यात पायांना गंभीरपणे दुखापती झाल्या आहेत. यामुळे आक्रमक झालेल्या नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी हायवे बंद करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

      काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास दुचाकी खड्यात धडकून अपघात झाला होता.  दुचाकीस्वाराला पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले. सतत दोन दिवस दुचाकी खड्यात धडकून अपघात होत असल्याने नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या सहीत ग्रामस्थ आक्रमक झाले हायवे प्राधिकरण उप अभियंता कुमावत यांनी ही नांदगाव आरोग्य केंद्र येथे येत माहिती घेतली.अपघातानंतर नांदगाव ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले होते त्यांना धारेवर धरत जर  सकाळी ९ पर्यंत खड्डे न बुजविल्यास हायवे रोखण्याचा इशारा नांदगाव सरपंच भाई  मोरजकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ९.३० वाजल्यापासून केसीसी कंपनी येत पावसाळी डांबराने खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today