सिंधुदुर्ग today
शाळा तिथे दाखला उपक्रमा अंतर्गत ४ हजार दाखल्यांचे वाटप.
तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती.
कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शाळा तिथे दाखला हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत सेवा पंधरावडाच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील २५८ शाळांमध्ये वय अधिवास व जातीचा दाखला देण्याबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे. आतापर्यंत कणकवली तालुक्यात शाळा तिथे दाखला उपक्रमांतर्गत १० हजार अर्ज आले आले असून, आतापर्यंत ४ हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
सेवा पंधरावडा या अंतर्गत प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून शाळा तिथे दाखला हा उपक्रम हाती घेण्यात आला. कणकवली तालुक्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी श्री. देशपांडे यांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र संचालक व सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे तालुक्यातील शाळांचे जबाबदारी सोपविण्यात आली असून, कणकवली तालुक्यातील २० महा-ई सेवा केंद्र व १ सेतू सुविधा केंद्र तसेच ग्रामपंचायत स्तरावरील ६२ आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत हे दाखले दिले जात आहेत.
कणकवली तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी प्रत्यक्षातही दाखले देण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. प्रति दाखला १०० रुपये यानुसार सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये हे दाखले दिले जात आहेत, अशी माहिती देशपांडे यांना दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा