सिंधुदुर्ग today
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालणारे महायुती सरकार! आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध. पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी केलेला संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ‘जल, जंगल आणि जमीन’ या मूलभूत अधिकारांसाठी त्यांनी दिलेला लढा पुढे घेऊन जात आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिनीचे अधिकार आणि पुढील पिढीला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे. बिरसा मुंडा यांच्या विचारांवर आणि कार्यावर खऱ्या अर्थाने चालणारे सरकार म्हणजे महायुती सरकार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्य...