पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
आयनल ग्रामपंचायत च्या वतीने बांधण्यात आला कच्चा बंधारा  कणकवली ( ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायतीच्या वतीने आज नदी काठी ओट्यावर कच्चा बंधारा बांधण्यात आला आहे.     यावेळी सरपंच सौ सिद्धी दहिबावकर, उपसरपंच , विलास हडकर, ग्रामपंचायत सदस्य.सौ योगिता फाटक, सौ रंजिता पेडणेकर, सौ संगीता कुबडे,मारुती तोरसकर, माजी सरपंच बापू फाटक,  संतोष वायंगणकर, गावातील शिक्षक पाताडे सर, नारकर सर, गुरव सर,सावंत सर ,अंगणवाडी सेविका सुमन फाटक, सोनाली घाडी, ग्रामपंचायत कर्मचारी  अमोल फाटक , तसेच गावातील ग्रामस्थ अनिल ओटवकर, सुशांत चव्हाण, विजय पेडणेकर , रवींद्र पेडणेकर, मनोहर पडवळ, मोहन लोके, दिपक लोके,राजेंद्र दहिबावकर,  तुषार वायंगणकर,दिनकर वायंगणकर, लवू चव्हाण , सहदेव दहिबावकर , दाजी ओटवकर, महेन्द्र लोके, यश पडवळ, रिषभ पडवळ, सौ सुनिता ओटवकर, सौ अंकिता मेस्त्री, सौ संध्या मेस्त्री, सुरेखा ओटवकर, सौ.गीता लोके, सावित्री ओटवकर, तसेच इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे श्री देव रवळनाथ, श्री पुर्वाई देवी, श्री दिर्बाई देवी श्री मुळ आकार - गणेश उत्सव समितीच्या वतीने रविवारी विविध कार्यक्रम. रात्री ८ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत नाट्यप्रयोग होणार सादर.  नांदगाव प्रतिनिधी  श्री देव रवळनाथ, श्री पुर्वाई देवी, श्री दिर्बाई देवी श्री मुळ आकार -  गणेश उत्सव समिती नांदगाव आयोजित श्री मूळ आकार श्री गणेश मंदिर वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे . यानिमित्त रात्री ठिक ८ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
आपला मेंदू आपल्याच मस्तकात ठेवा 'बाबासाहेबांचे विचार आणि आजचा काळ' व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवलीत व्याख्यान कणकवली/प्रतिनिधी        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आधी समाज सुधारणा नंतरच राजकीय सुधारणा याला महत्त्व दिले. मात्र आपल्या देशात समाज सुधारणेला प्राधान्य न देता सत्तेवर येण्याच्या चढाओढीत राजकारणाला प्राधान्य दिले गेले. यातूनच बहुजनांचा मेंदू ताब्यात घेण्यात आला. यापुढे मात्र बहुजनानी आपला मेंदू आपल्याच मस्तकात ठेवला नाही तर देशात अराजकता माजायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादक प्रसिद्ध कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर यांनी 'डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजचा काळ' या विषयावर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात  येथे केले.         महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंधेला कणकवली तालुका बौद्ध विकास संघातर्फे येथील बौद्ध विहाराच्या सभागृहात कवी कांडर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी कांडर यांनी बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर आधी त्यांच्या विरोधकांना समजून घ्यायला हवे तरच बाबासाहे...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील संरक्षण कठड्याला आदळून एस टी बसला अपघात  शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री २ वा. घडला अपघात. सुदैवाने सर्व सुखरूप. पोलीस पाटील वृषाली मोरजकर,भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर दिक्षा मोरजकर यांचे मदतीला सहकार्य  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील मध्ये असलेल्या डिवायडर संरक्षण  कठड्याला आदळून पुणे ते ओरस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा आज मध्यरात्री २ च्या सुमारास  अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला ठराविक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले अपघाताची भीषणता एवढी होती की मध्यरात्री गाड झोपेत दोन वाजता मोठा आवाज झाला. एस टी बसचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच हायवेलगत बाजूला असलेल्या नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचे घर असल्याने त्यांना तो आवाज येताच त्यांनी याबाबत तातडीने मदत मिळण्यासाठी बाजूलाच असलेले भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मग लगेचच पोली...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटवफाटा येथील त्या विहिरी लगत तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात आले बॅरेकेट. कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा येथील येथील त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विहिरी लगत संबंधित विभागाने आज बॅरिकेट लावला आहे.        सदर  विहीरीमध्ये काल एका बैलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आज संबंधित हायवे कंपनिच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी म्हणून लोखंडी बॅरेकेट लावण्यात आला आहे. त्या अगोदर स्थानिक काही ग्रामस्थांनी गुरे जावू नये म्हणून काटेरी शिरडे टाकून बंदीस्त केले होते. मात्र आज सकाळी संबंधित विभागाने लोखंडी बॅरेकेट लावले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
अपरिमित राजकीय आणि आर्थिक सत्तेच्या युती विरोधात लेखकांनी उभे रहावे चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार यांचे आवाहन रंगकर्मी अतुल पेठे, कादंबरीकार संग्राम गायकवाड, कवी सफरअली यांचा गौरव कोकण बरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातून रसिकांची उपस्थिती कणकवली/प्रतिनिधी      आज अपरिमित राजकीय आणि अपरिमित आर्थिक अशा दोन सत्तांची अत्यंत विषारी युती झालेली समाजात दिसते. या युतीने सगळी सामाजिक नैतिकता धाब्यावर बसवली आहे. मूल्य व्यवस्थाच हलवून टाकली आहे. लेखक, कवी म्हणून आपली लढाई या अपरिमित सत्तेविरुद्ध, विषमतेच्या दरी विरुद्ध आहे. हा काळच इतका भ्रमित करणारा आहे की आपल्या हेही लक्षात येत नाही आपण कुणाविरुद्ध लढायचे आहे. अशा काळात एकमेकांच्या अभिव्यक्तीला पैस देणे हेच भारतीयत्व आहे.हे लेखकाने लक्षात ठेवायला हवे. असे स्पष्ट प्रतिपादन चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी आणि अनुवादक प्रफुल्ल शिलेदार यांनी केले.         समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅ.नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटव फाटा सर्विस रस्त्यालगतच असलेल्या विहिरीमध्ये बैल पडून गतप्राण. सर्विस रस्त्याची उंची वाढल्याने विहिरीचा संरक्षण कठडाच गायब ; संबंधित विभाग लक्ष देईल का ? नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा प्राथमिक आरोग्य केंद्र सर्विस रस्त्यालगतच  असलेल्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची विहिरीमध्ये बैल पडल्याने बैलाचा मृत्यू झाला आहे.        सदर सर्विस रस्त्याची उंची वाढल्याने विहिरीचा असलेला  संरक्षण कठडा व रस्त्यांची उंची समान झाली आहे. तसेच योग्य प्रकारे विहिरी सभोवताली संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. बाजूलाच शेती असल्याने शेतामध्ये चरायला आलेली गुरे सरळ त्या वाटेने येत या विहिरीमध्ये पडतात यावेळी मध्ये या अगोदर दोन वेळा कुत्रे पडले होते तसेच वासरू आणि बकराही या विहिरीत पडला होता मात्र वासरू व बकरा पडल्याने तातडीने त्याला बाहेर काढल्याने त्या मुक्या जनावरांना जीवदान मिळाले होते. मात्र सदर आजचा बैल पडल्यानंतर कोणास न समजल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तरी संबंधित विभाग सभोवताली संरक्षण...