सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे हजरत असलदे पिर बाबा चा ऊर्स मुबारक उद्या  

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

नांदगाव येथे हजरत असलदे पिर बाबा  ( र. ह. ) चा ऊर्स मुबारक सालाबादप्रमाणे आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी असलदे येथे होणार आहे .

    या ऊर्स मुबारक निमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी  2  वाजता दोन्ही गौसिया मस्जिद येथून पिर बाबा चा संदल फूलाची चादर घेऊन सलाम नातेशरीफ पढत निघेल दुपारी तीन वाजता नांदगाव तिठा येथे रातीब खेळ होणार आहे .सलाम नातेशरीफ पढणार व सायंकाळी 4 .30 वाजता नांदगाव येथून पिर बाबा चा संदल फूलाची चादर घेऊन सलाम नातेशरीफ पढत बाबा च्या दर्गा शरीफ कडे निघेल रात्रीं 7 वाजता पिर बाबा चा स॑दल फूलाची चादर आलेल्या सर्व भाविक ग्रामस्थ यांना घेऊन बाबा ची फूल चादर सदल चढवणार व येथे सलाम नातेशरीफ पढणार दुऑ ( प्रार्थना) गा-हाणे सांगून आलेल्या सर्व भाविकांचे नवस बोलणार व बोललेले नवस फेडणार रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत बाबा ची नियाज  (महाप्रसाद) होणार आहे व रात्री 10 वाजता खास कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे 

  तरी सर्व असलदे पिर बाबा च्या ऊर्स मुबारक ला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नांदगाव ऊर्स कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today