सिंधुदुर्ग today
नांदगाव व्यापारी संघटनेच्या पैठणीची मानकरी समिक्षा चव्हाण तर द्वितीय अक्षता मोरये
कणकवली | प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव च्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात खास आकर्षण खेळ पैठणीचा कोण जिंकणार पैठणी या खेळात समिक्षा सुभाष चव्हाण ने पैठणीची मानकरी ठरली आहे तर व्दितीय क्रमांक पैठणी अक्षता रामचंद्र मोरये हीने प्राप्त केला आहे.
या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी एकूण 41 महीलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची रंगत आणली आहे.
पारितोषिक वितरणासाठी व्यापारी संघटना अध्यक्ष पपी सापळे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, पंढरी वायंगणकर ,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर, माजी सरपंच पांढरीनाथ पारकर,हनुमंत वाळके ,राजन मोरजकर, व्यापारी संघटना खजिनदार दिलिप फोंडके, सह सचिव हनुमंत म्हसकर, सदस्य प्रदीप हरमळकर आदी व्यापारी पदाधिकारी सभासद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यापारी संघटनेचे सचिव ऋषिकेश मोरजकर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा