सिंधुदुर्ग today
असलदे पोलीस पाटील पदाचा नांदगाव पोलीस पाटलांकडे अतिरिक्त कार्यभार.
कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काढले आदेश.
ग्रामस्थांनी नुतन पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचे केले स्वागत.
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील असलदे गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार आता नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्याकडे देण्यात यावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आदेश दिले आहे.त्यानुसार असलदे पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा असलदे ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करत सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
असलदे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशसेवा करणा-या भारतीय सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यात आली. त्यानंतर प्रभारी पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन परब , व्हा. चेअरमन दयानंद हडकर ,तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब, विजय आचरेकर, संतोष परब, विजय डामरे , महेश लोके, रघुनाथ लोके , अनिल नरे , प्रशांत परब, वासुदेव दळवी, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, बाबाजी शिंदे, ग्रा.प.सदस्या सुवर्णा दळवी, सपना डामरे , आनंदी खरात, विद्या आचरेकर, संतोष घाडी, सुदीन तांबे, एकनाथ डामरे, अनंत परब, गवस साटविलकर, तलाठी माधुरी काबरे, ग्रामसेवक संजय तांबे, कर्मचारी मधुसुदन परब, सत्यवान घाडी , प्रकाश वाळके, प्रतीक्षा परब, शिक्षक श्री. जंगले , शिक्षिका अर्चना लोके , विनिता सावंत, आशा सेविका भाग्यश्री नरे, अंगणवाडी सेविका कोमल परब आदी ग्रामस्थ आणि कृषीमित्र उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन केले.
असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वी कोळोशी येथील पोलीस पाटील संजय मारुती गोरुले यांच्याकडे होता. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगाव येथील पोलीस पाटलांकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिले.
असलदे गावातील ग्रामस्थांनी गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील व्यवस्था अथवा जवळच्या गावातील पोलीस पाटलांकडे कार्यभार देण्याची मागणी केली होती. कोळोशी येथील पोलीस पाटील गावापासून अंतरावर असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. नांदगाव पोलीस पाटलांकडे कार्यभार सोपविल्यामुळे असलदे ग्रामस्थांना पोलीस पाटील दाखले व इतर आवश्यक कामांसाठी होणारी गैरसोय कमी होणार आहे.प्रशासकीय पातळीवर कार्यवाही केल्याबद्दल ग्रामस्थांनी कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे तसेच संबंधित प्रशासनाचे आभार मानले आहेत. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा