सिंधुदुर्ग today
माजी पं.स.सदस्य गणेश तांबे यांना पितृषोक.
कणकवली/प्रतिनिधी
भरणी येथील माजी भारतीय सैनिक कै. आप्पा बाबू तांबे (95) यांचे शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी रात्रौ 10:45 वा. वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
तत्कालीन चीन आणि बांगलादेश युद्धामध्ये आप्पा तांबे हे भारतीय सैन्यामध्ये सहभागी झाले होते. 1973 साली ते भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. शनिवार 15 ऑगस्ट रोजी भरणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भरणी गावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य, कणकवली शेतकरी खरेदी-विक्री संघाचे संचालक गणेश तांबे यांचे ते वडील होत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा