सिंधुदुर्ग today



कणकवलीत 'निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह' शनिवारी.

संगीत विशारद गायकांची रंगणार मैफल.

सिंधुदुर्गातील रसिकांना अनोखी संगीत पर्वणी.

कणकवली/ प्रतिनिधी

         संगीततज्ज्ञ  निवृत्ती दाभोळे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त कणकवलीत शनिवार दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी 'निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह' आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील संगीत साधकांसाठी दर्जेदार मंच उपलब्ध करून देणे आणि शास्त्रोक्त संगीताचा प्रसार करणे हा या सोहळ्याचा उद्देश आहे.गंधर्व फाउंडेशन, कणकवली तथा कै. निवृत्ती दाभोळे शिष्यवृंद आणि मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम कणकवली कॉलेज येथील एचपीसीएल हॉलमध्ये सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे.

    आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्या विशारद पदवीधर शिष्यांची या कार्यक्रमात खास मैफल रंगणार आहे. सौ. मृणाल गांवकर, सौ. नेहा देशपांडे, कु. मिनल केळूसकर आणि कु. विदिता जोशी या गायिका शास्त्रोक्त गायन, नाट्यपद आणि अभंग गायन सादर करणार आहेत. त्यांना श्री. संदिप पेंडुरकर संवादिनीवर आणि वैभव सुतार तबल्यावर साथसंगत करणार आहेत. ध्वनी व्यवस्था संतोष सुतार, कुकारो साऊंड यांची असेल.

     कार्यक्रमासाठी शि. प्र. मंडळ, कणकवलीचे सचिव विजयकुमार वळंजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील वाघापूरचे रहिवासी असले निवृत्ती दाभोळे यांनी जीवन प्राधिकरणाच्या जलव्यवस्थापन व बांधकाम खात्यात अभियंता म्हणून सेवा केली. चिपळूण आणि कणकवलीत वास्तव्यादरम्यान त्यांनी अनेक गुरूंकडून तालीम घेतली. संगीतप्रेमींना एकत्र आणून त्यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम सादर केले. त्यांनी घडवले अनेक शिष्य आज संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. संगीत हाच त्यांचा श्वास होता.कला व संगीताचे पाईक असलेल्या दाभोळे सरांना जाऊन ८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा संगीत सोहळा आयोजित केला आहे. सर्व संगीतप्रेमी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today