सिंधुदुर्ग today
साळीस्ते येथे नुकसानग्रस्त शेतीची सभापती हर्षदा वाळके यांनी केली पाहणी. कणकवली प्रतिनिधी पंचायत समिती कणकवली यांच्या वतीने कणकवली तालुक्यातील साळीस्ते गावातील नुकसानग्रस्त शेतीची सभापती हर्षदा वाळके यांनी पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य श्रीम. प्राची इस्वलकर तसेच पं. स. कणकवली सदस्य राजेश जाधव यांनी भेट देऊन संपूर्ण गावातील भात नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना माहिती दिली. साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच , जितेंद्र गुरव, ग्रामपंचायत अधिकारी , राजलक्ष्मी जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहाय्यक, तंटामुक्ती अध्यक्ष गुरव मॅडम तसेच कार्यक्षेत्रातील कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.