सिंधुदुर्ग today

 ‌


देश  विघातक शक्तीना रोखण्याची आणि राष्ट्र सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाण्यासाठी तरुण पिढीला प्रबोधनाची गरज- मंत्री नितेश राणे.

नांदगाव येथील भारुड महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) 

देश  विघातक शक्तीना रोखण्याची आणि राष्ट्र सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाण्यासाठी तरुण पिढीला प्रबोधनाची गरज आहे आणि गरज भारुड मोहत्सवातून व भजनाच्या माध्यमातून पूर्णत्वास जाईल. तरुण पिढीला दिशा देण्याचे काम अशा उपक्रमातून होईल असा  विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

      महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित हिंदू जनजागृती भारुड महोत्सव २०२६ चा उद्घाटन सोहळा‌ मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते.

    यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर,कणकवली सभापती सौ. हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, मनोज रावराणे,कलाकार समिती जिल्हा अध्यक्ष संतोष कानडे,भजन समितीचे अध्यक्ष प्रकाश पारकर बुवा , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, उद्योजक विशाल कामत , असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर आदी मान्यवर व तालुक्यातील भजन सांप्रदायिकचे पदाधिकारी उपस्थित होते.

      यापुढे बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, माझ्या जवळ भजनी संस्थेचे पदाधिकारी जेव्हा आले भारुड महोत्सवाची संकल्पना मांडली तेव्हा भारुड महोत्सव माझ्या जिल्ह्यात होत असेल तर त्यातून समाज प्रबोधन होत असेल महाराष्ट्रातील पहीलाच भारुड महोत्सव नांदगाव येथे घेण्याचे सांगितले‌. आणि सुंदर असा भारुड महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे असेच महोत्सव दरवर्षी आपल्या जिल्ह्यात गावागावात व्हायला हवे फक्त कुठल्या गावात घ्याची ते गाव निवडण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा असे ही पालकमंत्री नितेश राणेंनी बोलताना सांगितले आहे.

आजुबाजुला ज्या घटना घडतायत जे हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहतात त्यांना अशा पध्दतीच्या भारुड महोत्सवाच्या माध्यमातून आपण एक हिंदू म्हणून त्या आवाजांना थेट त्यांच्या विरुद्ध उभ राहू शकतो एवढी ताकद भारुड महोत्सवात आहे. 

 प्रास्ताविक संस्थेचे सचिव बुवा निलेश ठाकूर , सुत्रसंचलन श्री. खानोलकर तर आभार बुवा प्रकाश पारकर यांनी मानले.या भारुड महोत्सवामध्ये एकूण नामवंत १२ बुवांनी सहभागी होवून विविध अध्यात्मिक कथा सांगत समाज प्रबोधन करण्याचे काम केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today