सिंधुदुर्ग today



विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मनसे विद्यार्थी सेना आक्रमक.

कणकवली तालुक्यातील शाळांबाहेरील एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घाला ; गटशिक्षण अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे निवेदन.

कणकवली : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सच्या वाढत्या विक्रीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कणकवली तालुक्यातील शाळांबाहेरील उपहारगृहे, हॉटेले तसेच स्टॉलवर विद्यार्थ्यांना विक्री केली जाणारी एनर्जी ड्रिंक्स तात्काळ बंद करण्यात यावीत, अशी मागणी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कणकवली यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेले कॅफीन व इतर उत्तेजक घटक विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. त्यामुळे शाळांच्या परिसरात अशा पेयांची विक्री रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थी, पालक आणि विक्रेत्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, मनसे कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कणकवली तालुका अध्यक्ष समीर तेली, कणकवली शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव तसेच सुनील सोनार उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता सर्वोच्च मानून प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रभावी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today