सिंधुदुर्ग today


कवयित्री मनीषा पाटील लिखित 'काहूर' कवितासंग्रहाचा कणकवलीत रविवारी प्रकाशन सोहळा

कृष्णात खोत, उषा परब, अजय कांडर, मधुकर मातोंडकर यांचा सहभाग

कणकवली, प्रतिनिधी  

     समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री मनीषा पाटील लिखित आणि रावा प्रकाशन प्रकाशित  'काहूर'  कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार 16 ऑगस्ट 2026 रोजी स. 10.30 वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान नाट्यगृहात आयोजित करण्यात आला  आहे.

     साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 

ज्येष्ठ कादंबरीकार आणि कवयित्री उषा परब, नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर, तसेच समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

        तर कार्यक्रमाला डॉ. धनश्री तायशेटे सावंत - अध्यक्ष, कणकवली शिक्षण संस्था; डॉ. संदीप सावंत चेअरमन- कणकवली शिक्षण संस्था; डॉ. एस. एन. तायशेटे चेअरमन- शालेय समिती, कणकवली शिक्षण संस्था; डी. एम. नलावडे सचिव- कणकवली शिक्षण संस्था; एम. ए. काणेकर उपकार्याध्यक्ष- कणकवली शिक्षण संस्था; आणि जी. एन. बोडके प्राचार्य- एस. एम. ज्युनिअर कॉलेज, कणकवली यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.समाज साहित्य प्रतिष्ठान आणि मिळून साऱ्याजणी परिवार यांच्या वतीने हा साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या उपाध्यक्ष म्हणून कोकणच्या साहित्य चळवळीत योगदान देणाऱ्या तसेच गेली अनेक वर्ष काव्य लेखन करणाऱ्या कवयित्री मनीषा पाटील यांच्या या दुसऱ्या 'काहूर ' कवितासंग्रह प्रकाशनाला साहित्यरसिक, वाचक आणि कविता प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक महिसाठी संपर्क - संपर्क : 94228 19474

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today