सिंधुदुर्ग today


नांदगाव शाळा नं.१, उर्दु शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप.

प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने उपक्रम; पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा पुढाकार

कणकवली : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने आणि यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार  नांदगाव शाळा नं. 1, उर्दु शाळा येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

नांदगाव गावातील  नांदगाव शाळा नं. 1, उर्दु शाळा या शाळांमघ्ये मंगळवारी मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी  कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके नांदगाव सरपंच रविराज मोरजकर , उपसरपंच इरफान साटविलकर , माजी उपसरपंच निरज मोरये, मारुती मोरये ,रज्जाक बटवाले, पत्रकार ऋषिकेश मोरजकर ,रघुनाथ लोके, प्रवीण डगरे, महेश लोके, गोविंद लोके, पंकज आचरेकर, मनोज लोके,  ग्रा.प.सदस्य आनंद तांबे, विजय खरात, रुपेश खरात, प्राण जीवन सहयोग संस्थेचे प्रतिनीधी मनोज राणे,  अनिप सावंत, सिध्देश सावंत, पप्पी वायंगणकर,  मुख्याध्यापक सुहास सावंत ,शिक्षक संतोष देसाई, प्रशांत सर्पे, प्रतिमा पोकळे,गितेश्वरी वळंजु , प्रज्ञा पवार ,जमसु गावित,उर्दू शाळा मुख्याधापक मुस्ताक अन्वर शेख, मुस्ताक कितुर, अजमुद्दीन शेख आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today