सिंधुदुर्ग today
नांदगाव भारुड महोत्सवाचे शानदार उद्घाटन ; भजनी बुवा मंडळींची नांदगाव येथे मांदियाळी
पालकमंत्री नितेश राणे सायंकाळी ५ वा. भारुड महोत्सवाला राहणार उपस्थित.
नांदगाव / (ऋषिकेश मोरजकर)
समाजाला भक्ती मार्गाच्या माध्यमातून परमेश्वराशी जोडलं जाव आणि चांगल जीवन जगण्यासाठी, अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी या संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी भारुड महोत्सव हा खूप महत्त्वाचे आयोजन कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी मंडळ केले आहे.असे प्रतिपादन कणकवली सभापती सौ हर्षदा वाळके यांनी केले.
महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित हिंदू जनजागृती भारुड महोत्सव २०२६ चा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.यानिमित्त संपूर्ण नांदगाव पंचक्रोशीत हरिणामाचा स्वर गुंजला.
या कार्यक्रमाचा उद्धाटन सोहळा कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर सभापती सौ हर्षदा वाळके, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, कलाकार समिती जिल्हा अध्यक्ष संतोष कानडे,जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, भजन समितीचे अध्यक्ष प्रकाश पारकर बुवा , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, हेमंत परुळेकर, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, बेळणे सरपंच अविनाश गिरकर, पत्रकार समिती अध्यक्ष भगवान लोके, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, आयनल माजी सरपंच बापू फाटक आदी मान्यवर व तालुक्यातील भजन सांप्रदायिकचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात भजनाची लय बदलली.२०-२० सारख्या झटपट सादरीकरण प्रेक्षकांचा मनोरंजनासाठी जास्त ओढा पाहता भजनांचा महत्वाचा गाभा कमी कमी होताना पहायला मिळत आहे.पारंपारिक भजनामधील भारुड ज्यामुळे पौराणिक,अध्यात्म व समाज प्रबोधन होत असायचे यामधून युवावर्ग व नागरिकांना कथा आपल्या धर्माची शिकवण देव देवतांची माहीती मिळायची.या कथांच्या आधारे भजनी बुवा समाज प्रबोधन करायचे हे काही दिवसांपासून कमी झाले.याच अनुषंगाने राज्यात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित हिंदू जनजागृती भारुड महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला.याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा