सिंधुदुर्ग today



नांदगाव हायस्कूलसमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंग टाकावं.

मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन.

कणकवली : (प्रतिनिधी)

नांदगाव येथील हायस्कूलसमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. अनिकेत अनंत यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कणकवली येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

नांदगाव हायस्कूलसमोर दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक रस्ता ओलांडत असतात. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असून अनेक वाहने वेगाने जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये शाळेसमोर स्पष्टपणे दिसेल अशा स्वरूपात झेब्रा क्रॉसिंग, “School Ahead” व वेगमर्यादा दर्शविणारे फलक, तसेच आवश्यकतेनुसार स्पीड ब्रेकर अथवा रम्बल स्ट्रिप्स बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today