सिंधुदुर्ग today

 


कोळोशी माजी सरपंच सुशील इंदप यांना पितृशोक 

नांदगाव/वार्ताहर 

    कोळोशी मधलीवाडी येथील दिनकर तुकाराम इंदप (७५) यांचे आज शनिवारी सकाळी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.ते कोळोशी माजी सरपंच तथा भाजप नांदगाव शक्ती केंद्र प्रमुख सुशील इंदप यांचे वडील होते.तर माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी- हडपिडचे ते निवृत्त शिक्षकेतर कर्मचारी होते.

   गावातील सर्व धार्मिक विधीमध्ये दिनकर इंदप यांचा मोठा सहभाग असायचा.तर एक प्रामाणिक व शांत संयमी माणूस अशी त्यांची परिसरात ओळख होती.त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today