सिंधुदुर्ग today



'महात्मा फुले विचार आणि कार्य' विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा'.

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजन.

स्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर 

कणकवली/प्रतिनिधी

       महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मदिनानिमित्त राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दीर्घ काव्य लेखन काव्य आयोजित करण्यात आली आहे. 'फुले यांचे विचार आणि कार्य' या विषयावर ही स्पर्धा घेण्यात येत असून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन राष्ट्र सेवा दल दिवाळी अंक संपादक तथा अ.भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कवी अजय कांडर यांनी केले आहे.

      पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ एक हजाराची तीन पारितोषिके दिली जातील. या सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. पहिल्या तीन पारितोषिक विजेत्या कविता किंवा फार दीर्घ असल्यास त्यांचा काही भाग राष्ट्र सेवा दलच्या 2026 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

     स्पर्धेचे नियम- कविता किमान 20 पानांची असावी. त्यापेक्षा कितीही मोठी चालेल. पंधरा ते वीस ओळींच्या दरम्यान एक पान असेल असे समजावे. छंदोबद्ध कविता असेल तर पाच कडव्यात एक पान असेल असे समजावे.कवितेच्या टपालावर कवीने आपला मोबाईल नंबर स्पष्ट वाचता येईल असा लिहावा. कविता पानाच्या एकाच बाजूला, वाचता येईल अशा अक्षरात लिहून किंवा टाईप करून कुरियर किंवा पोस्टाने एका प्रतीत पाठवावी.कविता पाठविण्याचा पत्ता : बुद्धभूषण रवींद्र बगाडे

द्वारा राष्ट्र सेवा दल, मध्यवर्ती कार्यालय,सिंहगड रोड,पर्वती पुणे 411030

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today