सिंधुदुर्ग today



माजी शाखा प्रमुख विजय घरत यांच्या माध्यमातून नांदगाव प्रा.आ.केंद्राला औषध साठा प्रदान.

कणकवली प्रतिनिधी 

मुंबई येथील माजी शाखाप्रमुख विजय घरत यांच्या माध्यमातून नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांना आवश्यक असलेला औषध साठा वाटपाचा कार्यक्रम आज  नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला.

      नांदगाव आरोग्य केंद्राला औषध साठा ची गरज असल्याचे नांदगाव सरपंच भाई मोरजकर व खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर यांनी सांगितले होते. या अनुषंगाने आज विजय घरत यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मोफत औषध साठा प्रदान केला.

       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा मगदूम, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संतोष जाधव, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख मारुती मोरये, आरोग्य सहाय्यक श्री.दिपक कांबळे,श्री. राठोड,श्री.साटम सर्व आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today