सिंधुदुर्ग today



पाचव्या सिंधुदुर्ग समाज साहित्य भाषा विचार संमेलनाची रूपरेषा जाहीर.

परिसंवाद, पुरस्कार वितरण, सत्कार आणि कविसंमेलन : २९ रोजी वसई येथे संमेलन.

संदेश भंडारे,उदय जाधव, अक्षय शिंपी यांचा गौरव.

संस्थाध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांची माहिती.

कणकवली / प्रतिनिधी

   सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान आणि सहयोग संस्था वसई यांच्या संयुक्त विद्यमाने वसई येथे शनिवार २९ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली समाज साहित्य भाषा विचार संमेलन आयोजित करण्यात आले असून त्याची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. परिसंवाद, पुरस्कार वितरण, सत्कार आणि कविसंमेलन असे संमेलनात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आद्य इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्काराने विख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांना तर नाटककार जयंत पवार पुरस्काराने तरुण नाटककार उदय जाधव यांना आणि प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी पुरस्काराने तरुण कवी अक्षय शिंपी यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि सचिव सुरेश बिले यांनी दिली.

   सिंधुदुर्ग सुपुत्र आद्य इतिहासकार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू कृष्णराव अर्जुन केळुसकर आणि दुसरे सिंधुदुर्ग सुपुत्र कथाकार नाटककार समीक्षक जयंत पवार यांच्या स्मरणार्थ समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विविध भागात साहित्य संमेलने आयोजित करत आहे. यावर्षी हे संमेलन वसई येथे सहयोग संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घघाटन अण्णासाहेब वर्तक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास बंधू वर्तक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान ही सिंधुर्गातील संस्था असली तरी या साहित्य चळवळीला पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागातील लोक कार्यकर्ते म्हणून जोडले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग बरोबर महाराष्ट्राच्या विविध भागात या संस्थेचे संमेलन आयोजित केले जाते. त्याचबरोबर गुरुवर्य केळुसकर आणि जयंत पवार या सिंधुदुर्ग भूमीतील लेखकाने कधी प्रादेशिक मर्यादा पाळली नाही हा विचारही समाज साहित्य प्रतिष्ठानची संमेलने महाराष्ट्रात आयोजित करण्यामागे आहे. यामुळेच यावर्षीचे संमेलन जेष्ठ कवी सायमन मार्टिन यांच्या सहयोगातून त्यांच्या सहयोग या संस्थेच्या सहकार्याने संमेलन आयोजित केले आहे.

   उद्घघाटन सत्रात पुरस्कार वितरणासोबतच प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लोकप्रिय कवयित्री आणि अभिनेत्री कविता मोरवणकर यांच्या ' उद्याचा दहशतगर्द अंधार' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ' समाज आणि साहित्य ' या विषयावर महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात कादंबरीकार सुशील धसकटे आणि भाषा अभ्यासक प्रा. शैलेश औटी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

   तर तिसऱ्या सत्रात कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून यात पुढील कवींना निमंत्रित करण्यात आले आहे -वर्जेश सोलंकी, सफरअली इसफ, उत्तम भगत, कविता मोरवणकर, संगिता अरबुने, फेलिक्स डिसोझा, शिल्पा पै, आत्माराम गोडबोले, डॉ. योगिता  राजकर, मनीषा शिरटावले, विजय सावंत, संजय शिंदे, महेश लिला पंडित, इग्नेशियस डायस, पल्लवी बनसोडे, मनोहर पाटील, प्रकाश ग.जाधव, हरिश्चंद्र भिसे, प्रज्ञा मातोंडकर, शिवाजी गावडे, मोहन काळे, दीपा सावंत खोत,भालचंद्र सुपेकर, महावीर कांबळे, पंडित कांबळे, संचिता चव्हाण, संतोष येळवे, सत्यवान साटम, रेखा शिर्के, शुभांगी तरडे, संतोष यळवे, अक्षता गावडे, इमेल आल्मेडा, संध्या लगड, ख्रिस्तोफर रिबेलो, रेबेका दोडती, सिरील मिनेजीस, प्रिती भोईर, संगीता पाटील, दीपाली ठाकूर, सुषमा राऊत, स्वाती भोईर, शीतल संखे, संतोष संखे, विजय ठाकूर, विजय पुरव, श्वेता म्हात्रे, संध्या सोंडे, मनोहर पाटील, विशाखा गव्हाणकर, नम्रता माळी पाटील, शुभम पाटील, शबाना विक्टर, रमाकांत पाटील, मोहीन शेख. सकाळी ९.३० ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार आहे.अधिक माहितीसाठी संपर्क - 94215 49666

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today