सिंधुदुर्ग today
महामार्गावर गुरे मोकाट ; वाहनधारकांना डोकेदुखी.
नांदगाव येथे एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने बैल जागीच ठार.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव परिसरात मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर गुरे मोकाट सोडून दिली जात असून या मुळे वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. दोनच दिवसांपूर्वी एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने बैल जागीच ठार झाला होता. मोकाट जनावरांचा अपघात झाल्यानंतर मालक ही पुढे न येत असल्याने त्या अपघातात मृत्यू झालेल्या बैलाची विल्हेवाट लावण्यासाठी येत नाही. या मोकाट जनावरांना संबंधित मालकांनी हायवे पासून दुर इतरत्र चरण्यासाठी न्यावे. जेणेकरून त्या मुक्या जनावरांचे प्राण धोक्यात येणार नाही. आणि हायवे वरून जाणाऱ्या वाहनांना व विशेषता दुचाकी धारकांना सुखाचा प्रवास करता येईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा