सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा येथे हायवे सर्विस रस्त्याला खड्डेच खड्डे
वाहनधारकांची डोकेदुखी वाढली ;खड्डे न बुजविल्यास वृक्षारोपण.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा हा महत्त्वाचा टप्पा आहे. याच नांदगाव तिठ्यावरुन बरीच वाहतूक होत असते देवगड निपाणी राज्य महामार्ग मध्य भागातून गेलेला आहे. अशातच गेले काही महिने हायवे सर्विस रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून याचा फटका वाहनधारक विशेषता दुचाकीस्वार यांना बसत आहे.
आता पावसाळा सीजन चालू झाल्यामुळे या खड्ड्यात पाणी साचून या खड्ड्यांची वाढ आणखीन होत आहे. तरी संबंधित विभागाने सदर खड्डे त्वरित बुजवावे अन्यथा त्या खड्ड्यांवर वृक्षारोपण करून आंदोलन केले जाईल. असा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा