सिंधुदुर्ग today



गोलपिठा काव्य पुरस्कार: प्रत्येकी पाच कविता पाठविण्याचे आवाहन

सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे गोलपिठा काव्य पुरस्काराचे आयोजन: ३० जून पर्यंत कविता पाठविण्याची अंतिम तारीख

कणकवली / प्रतिनिधी

       गुणवत्ता असणाऱ्या कवीना प्रेरणा देणारी साहित्य संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करत असलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे उत्तम कवीचा शोध घेण्यासाठी कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या बहुचर्चित गोलपिठा काव्यसंग्रहाच्या नावाने काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. ही काव्य पुरस्कार योजना सर्वांसाठी खुली असून या पुरस्कार योजनेसाठी प्रत्येक कवीने आपल्या पाच कविता टपलाने किंवा कुरिअरने पाठविणे बंधनकारक आहे. एकूण येणाऱ्या कवितांमधून एका उत्कृष्ट कवीची गोलपिठा काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. दोन हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप असून या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आलेली नाही. तरी सहभागी होणाऱ्या कवींनी 30 जून २०२५ पर्यंत आपल्या पाच कविता कुरियरने किंवा पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम आणि सचिव सूर्यकांत साळुंखे यांनी केले आहे.

    कवितेला विषय आणि शब्दांची मर्यादा नाही. कविता स्वतंत्र असाव्यात. अनुवादित केव्हा आधारित नसाव्यात 30 जून पर्यंत प्राप्त होणाऱ्या कवितांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. मान्यवर साहित्य अभ्यासकांच्या परीक्षक मंडळातर्फे उत्कृष्ट कवीची  पुरस्कारासाठी निवड केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. त्यात सम्यक संबोधी साहित्य संस्था पदाधिकारी हस्तक्षेप करणार नाहीत.पुरस्कार विजेत्याला कणकवली येथे होणाऱ्या पुरस्कार पारितोषिक सोहळ्यात उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणे बंधनकारक असेल. तशी तयारी नसणाऱ्या कवीला हा पुरस्कार दिला जाणार नाही.

    कविता पाठविण्यासाठी संपर्क - किशोर कदम, फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंग कणकवली , कणकवली कॉलेज रोड नवीन पोस्ट ऑफिस च्या वरती. पि.४१६६०२,संपर्क -९४२२९६३६५५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today