सिंधुदुर्ग today


नांदगाव आरोग्य केंद्राच्या विहिरीमध्ये पडलेल्या कुत्र्याला प्राणी मित्राने दिले जीवदान.

नांदगाव प्रतिनिधी 

मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा सर्विस रस्त्यालगत नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची विहीर आहे. हायवेच्या चौपाटी केल्यानंतर सदर विहीर ही सर्विस रस्त्यालगत सर्विस रस्त्याच्या उंची समान झाल्याने या विहिरीमध्ये वारंवार कुत्रे गुरे तसेच बोकड पडत असतात असाच आज पहाटे या विहिरीमध्ये एक कुत्रा पडल्याचे निदर्शनास आले तात्काळ वन विभागातील प्राणी मित्र विठ्ठल बिडये यांना याबाबत माहिती देताच विठ्ठल बिडये तसेच कोळोशीतील प्राणी मित्र मंदार राणे यांनी या जिवंत कुत्र्याला कसोटीने विहिरी बाहेर काढले आणि त्या कुत्र्याला जीवदान दिले. 

         गेल्या वर्षी या विहिरीमध्ये एका शेतकऱ्याचा बैल विहिरीमध्ये पडून मृत्युमुखी पडला होता. तसेच एका कुत्र्याचाही मृत्यू या विहिरीमध्ये पडून झाला होता त्याचप्रमाणे एका बोकडाला मात्र विहिरीतून जिवंत बाहेर काढण्यात त्यावेळी यश आले होते.

      सदर विहिरीची उंची सर्विस रस्त्याच्या समान झाल्याने या विहिरीची उंची तातडीने वाढवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today