सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे अज्ञात जखमी वासराला केले उपचार ; प्राणी मित्रांनी दाखवली सहानुभूती.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव हायवे वरून तसेच परिसरात मोकाट जनावरे सोडून देत आहेत त्यामुळे वाहनधारकांना त्रास होतो अशातच काही जनावरे अपघातात जखमी होतात तर काही दगावतात. अशाच प्रकारे काल पासून एक अज्ञात गाईचे वासरू नांदगाव ओटव फाटा ब्रिज लगत जखमी अवस्थेत आढळून आले. या वासरावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देऊ बागवे यांना संपर्क भाई मोरये, निरज मोरये, नंदू मोरये,प्रविण मोरये, विशाल मोरये, महम्मद साटविलकर , योगेश मोरये यांनी संपर्क साधला आणि या वासराला उपचार करुन प्राणी मित्रांनी सहानुभूती दाखवली आहे.याबाबत सदर माहिती नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांना देण्यात आली आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा