सिंधुदुर्ग today



कोळोशी येथे भव्य जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा.

नांदगाव/ वार्ताहर 

      माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून गजानन विकास मित्र मंडळ कोळोशी मधली वाडी आयोजित जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.तरी स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

     जिल्हास्तरीय रेकॉर्ड भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन माघी गणेश जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त कोळोशी मधली वाडी गणेश मंदिर येथे आयोजित केली असून प्रथम विजेत्या स्पर्धकास रोख रक्कम ५५५५ व चषक तसेच प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.तर द्वितीय क्रमांक विजेत्यास रोख रक्कम ४४४४ चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.तृतीय विजेत्या स्पर्धकास रोख रक्कम ३३३३ चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.तर उत्तेजनार्थ दोन बक्षिसे असून प्रत्येकी १००१ रोख रक्कम चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.शिवाय वैयक्तिक बक्षिसांचीही या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात मिळतील असा प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला मिळणार आहे.हि स्पर्धा खुल्या गटात होणार आहे.याची नोंद घेऊन आपली नावे चंद्रकांत शिंदे ७३९७९३४२४१ , सुशिल इंदप ७३९७९३४९९१ यांच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा.३० जानेवारी पर्यंत नाव नोंदणीसाठी मुदत असेल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.असे आवाहन गजानन विकास मित्र मंडळ कोळोशी मधली वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today