सिंधुदुर्ग today
कणकवली पंचायत समिती सभापती कोण ? उत्सुकता वाढली
उद्या होणार सभापती निवड
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्यानंतर त्याचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी लागला होता. याला उद्या ९ मार्च रोजी एक महिना पूर्ण होत आहे उद्याच सर्व तालुका निहाय पंचायत समिती सभापतीची निवड होणार आहे. कणकवली पंचायत समितीचा विचार करता कणकवली पंचायत समिती सभापती हे ओबीसी महिला या आरक्षण असल्याने काही मोजक्याच पंचायत समिती गणातून महिला ओबीसी निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे कोणाची वर्णी कणकवली सभापती पदी लागणार याची कमालीची उत्सुकता कणकवली तालुक्यात लागून राहिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा