सिंधुदुर्ग today
महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी सुधारक पुरुषांचा मेळावा संपन्न.
आपलं कुटुंब चांगले चालले तर आपला समाज चांगला चालतो. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे.
कणकवली प्रतिनिधी
महिला आर्थिक विकास महामंडळ हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली , कणकवली पोलीस तसेच सुधारक पुरूष यांची संयुक्त बैठक कलमठ ग्रामपंचायत येथे आज संपन्न झाली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, समुपदेशन पोलीस स्टेशन कणकवली च्या रिया सांगेलकर, हिरकणी कक्ष कणकवली अध्यक्षा सोनाली कावले, कलमठ ग्रामपंचायत सदस्या स्वाती नारकर, व्यवस्थापक सीमा गावडे , उपजिवीका सल्लागार अक्षय मोडक, उपजिवीका सहयोगीनी भक्ती उंबळकर क्षमता सहयोगीनी भारती नारीग्रेकर, सहयोगीनी प्रिया नानांचे ,सहयोगीनी स्हेहा कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित महिला मान्यवर मंडळींनी व्यवसाय, महिला सक्षमीकरण महिलांवरील अत्याचार आदींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे बोलताना म्हणाले की, आपलं कुटुंब चांगले चालले तर आपला समाज चांगला चालतो. संसाराची दोन चाकं आहेत. ही दोन्ही चाके सुरळीत सुरू झाली तर आपला संसार योग्य प्रकारे होतो. महिला आर्थिक विकास महामंडळ हिरकणी कक्ष कणकवली यांचा उद्देश योग्य असून प्रत्येक कुटुंबातील महिला आर्थिक सक्षम व्हायला हवी. यासाठी आलेल्या पुरुषांनी यासाठी सहकार्य करीत हा प्रसार गावागावात पोहोचवण्यासाठी मदत करावी यासाठी आमची मदत काही लागल्यास जरूर सांगावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नांदगाव येथील विविध राबविण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण व व्यवसाय अनुभव याबाबत ऋषिकेश मोरजकर यांनी माहिती दिली. तर सावडाव येथील शेतकरी उद्योजक उत्तम वारंग यांनी ही आपल्या व्यवसायाची माहिती दिली. व असे व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रम प्रास्ताविक व आभार व्यवस्थापक सौ. सिमा गावडे यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा