सिंधुदुर्ग today



नांदगाव मध्ये आठवडा बाजारात स्वच्छतेचा जागर

तिठा परिसर केला स्वच्छ

नांदगाव : प्रतिनिधी 

नांदगाव ग्रामपंचायत च्या सहकार्याने आणि स्वच्छता मिशन,सिंधुदुर्ग च्यावतीने नांदगाव तिठ्ठा बाजारपेठ येथे रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  स्थानिकांसह,लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, रिक्षा संघटना पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.नांदगाव तिठ्ठा परीसराची स्वच्छता करीत सर्वांना स्वच्छता संदेश देणारी पत्रके वाटप करीत स्वच्छेचे महत्त्व पटवून देण्यात आले. 

सुरुवातीला मिशन सिंधुदुर्ग चे मुख्य स्वच्छता दूत  पत्रकार गणेश जेठे यांनी प्रास्ताविक करताना स्वच्छता मिशन चे काम सांगितले.त्याशिवाय स्वच्छता मोहीम का राबवली जाते याची माहिती दिली.राष्ट्रगीताने स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळेस जि.प.सदस्य संतोष पारकर,पं.स.सदस्य हर्षदा वाळके,सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र सावंत, माजी जि.प.सभापती नागेश मोरये,माजी सरपंच पंढरीनाथ वायंगणकर,वैभववाडी नायब तहसीलदार दिलिप पाटील,वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके,प्रा.विनायक पाताडे,नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा मगदुम,व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेंद्र उर्फ पप्पी वायंगणकर, रिक्षा संघटना अध्यक्ष किशोर मोरये, विलास कांडर,भाऊ काझी,दिलीप बापार्डेकर,तेजस माळकर,सुनिल गावकर,पत्रकार संजय सावंत,उत्तम सावंत,प्रदिप राणे, तुषार नेवरेकर,मोहन पडवळ, ऋषिकेश मोरजकर, गुरूप्रसाद सावंत, सचिन राणे,नम्रता कुडाळकर, आश्विनी पेडणेकर,आनंद परब, रोहित मोंडकर, प्रदिप हरमलकर,अद्वैत सावंत, विजय जामदार ,विजय गायकवाड याच्यासह स्वच्छता दूत व ग्रामस्थ उपस्थित होते.

जि.प.सदस्य संतोष पारकर यानी , स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने नांदगाव येथे स्वच्छता अभियाना सारखा चांगला उपक्रम राबवून सामाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम केले आहे असे सांगत शुभेच्छा दिल्या.तर पं.स.   सदस्य हर्षदा वाळके यानी स्वच्छता अभियानाची गरज असून नागरिकांच्या मनावर स्वच्छतेचे बीज रोवले पाहीजे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा भविष्यात प्लास्टिक हीच मोठी आपत्ती आहे. यामुळे प्रत्येकाने प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा. स्वच्छतेची शिस्त पात्येकानी लावली पाहीजे. स्वच्छतेचे ब्रिज रोवणा-या स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग काम उल्लेखनीय असल्याचे सांगीतले.

त्याचबरोबर नांदगाव सरपंच रविराज मोरजकर बोलताना म्हणाले,नांदगाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.एक प्रेरणादायी उपक्रम आहे.या उपक्रमातून ग्रामस्थांनी बोध घेऊन जसे निवडूकीसाठी घरोघरी फिरतो तसे स्वच्छतेसाठी घरोघरी फिरून प्रत्येक ग्रामस्थांना संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गाव स्वच्छ करून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर गावाचे नाव स्वच्छतेत मोठे करावे. तसेच पंढरी वायंगणकर,दिलीप पाटील यानी या उपक्रमाचे गौरवोद्गार काढत विशेष कौतुक केले.जि.प.सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यानी दूरध्वनीवरून मोहीमेची माहिती घेत शुभेच्छा दिल्या. 

या स्वच्छता मोहिमेत नांदगाव तिठ्ठा व बाजारपेठ परिसरात स्वच्छता करत आठवडी बाजारातील व्यापा-यांसह स्थानिक व्यापारी व नागरीकांना स्वच्छतेचे संदेशाची पत्रके वाटप करण्यात आली. यात कचरा गोळा करण्यासाठी लागणा-या पिशव्या साईकृपा कन्स्ट्रक्शन कणकवली चे मालक राजू मानकर, अल्पोपहार पंढरी वायंगणकर,पाणी व ग्लोज रविराज मोरजकर व झाडू खान यानी देत स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या नांदगाव येथील उपक्रमास सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today