पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
भाजपा अनु .जाती सेलच्या कणकवली  विधानसभा संयोजक पदी संतोष जाधव यांची निवड कणकवली प्रतिनिधी        संतोष जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती सेलच्या कणकवली  विधानसभा संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.यांच्या निवडीने अभिनंदन केले जात आहे.        संतोष जाधव हे मुळ दिगवळे  रांजणवाडी येथील ,परंतू गेली २४ वर्षे ते नांदगाव येथे घर बांधून स्थायिक झाले आहेत . ते केंद्रप्रमुख म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावून सेवानिवृत्त आहेत . जाधव सर हे सेवेत असताना शिक्षक संघटनेत ही त्यांनी जिल्हास्तरावरील महत्वाची पदे भुषविली आहेत .सध्या ते महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघ या राज्यस्तरीय संघटनेत राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत .त्यामुळे त्यांचा लोक संग्रह चांगला आहे .शिवाय ते भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र या राज्यस्तरीय सामाजिक संघटनेत सध्या जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत .सेवाकाळात त्यांना आविष्कार फांऊंडेशन या  संघटनेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून पुरस्कारही प्राप्त आहे . संपूर्ण जिल्हयात जि .प . चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांचे ते विश्वासू निकटवर्तीय म्हणूनही परिचित असून युवा संद

सिंधुदुर्ग today

इमेज
  राजकीय सामाजिक प्रदूषणात संघटित होणे हाच उपाय 'हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून' ग्रंथाच्या चर्चासत्रात अभ्यासकांचे मत अंकुश कदम लिखित ग्रंथावरील चर्चासत्रात हुमायून मुरसल,अजय कांडर,नारायण खराडे यांचा सहभाग सावंतवाडी/प्रतिनिधी          एखादा सामाजिक कार्यकर्ता समाज स्तरावर जाऊन काम करतो आणि ते अनुभव शब्दातून मांडतो तरी मात्र मूळ समस्या सुटत नाही. या प्रत्येक गोष्टी मागे राजकारणच कारणीभूत असतं. त्यामुळे सामाजिक राजकीय प्रदूषणात निखळ माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या सगळ्यांनी एकत्र येऊन लढा उभारणे हाच यामागील उपाय आहे असे मत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अंकुश कदम लिखित 'हस्तक्षेपाच्या कणखर भूमितून ' या ग्रंथावरील चर्चासत्रात विविध अभ्यासकांनी व्यक्त केले.         सत्यशोधक समता प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या सदर चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत - सामाजिक कार्यकर्ते हुमायून मुरसल ( कोल्हापूर) कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर (कणकवली), नाटककार नारायण खराडे (गोवा) आदी सहभागी झाले होते. समता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते योगेश सपकाळ यांच्या अध्यक्

सिंधुदुर्ग today

इमेज
श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त उद्या विविध कार्यक्रम  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी नवरात्रोत्सव आणि मित्र श्री सत्यनारायणाची महापूजा उद्या रविवार दिनांक १३ ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.     यानिमित्त कार्यक्रम पुढील प्रमाणे सकाळी ठीक दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ ते ३ तीर्थप्रसाद महाप्रसाद , सायंकाळी ४ ते ५ फुगडी, सायंकाळी ५ ते ६ मुलींचे दिंडी भजन, रात्री ७ ते ९ पर्यंत सुस्वर भजने , रात्री १० वा. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सिध्दीविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे देवगड निपाणी महामार्गाचे रस्ता सिमेंट काँक्रीट कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. देवगड निपाणी हा राज्यमार्ग निधीसाठी पालकमंत्र्यांकडे मी हट्ट धरला - आमदार नितेश राणे  देवगड ते फोंडाघाट पर्यंत ६६ किलोमीटर अंतरावरील होणार काम  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) आ.श्री नितेश  राणे यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने देवगड निपाणी रस्ता सिमेंट काँक्रीट करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आज  कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते नांदगाव तिठा ब्रिज खाली शुभारंभ करण्यात आला आहे .       देवगड निपाणी हा राज्य महामार्ग देवगड ते फोंडा घाट पर्यंत दुपदरी तसेच काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजुर महामार्ग दर्जेदार बनावा  यासाठी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला. आणि मी हट्ट धरल्यानंतर पालकमंत्र्यांनी माझा हट्ट पूर्ण केला असे मत आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे व्यक्त केले आहे. तसेच हा रस्ता करताना ठेकेदाराने चांगल्या दर्जाचा रस्ता करावा काही अडचण असल्यास आम्हाला सांगावे तसेच कुठल्याही प्रकारे

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे आनंदनगर येथील विश्वास चव्हाण बेपत्ता  कणकवली प्रतिनिधी  कासार्डे आनंदनगर येथील विश्वास रघुनाथ चव्हाण वय ५७ हे मोल मजुरीचे काम मिळते का ? बघून येतो असे सांगून ८ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घरातून बाहेर पडले होते. मात्र ते सायंकाळी उशिरापर्यंत  घरी परत आले नाही तसेच त्यांचा शोध घेऊनही ते मिळाले नाही त्यामुळे खबर त्यांचा भाऊ विष्णू रघुनाथ चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे विश्वास चव्हाण यांनी अंगात लाल रंगाच्या रेघांचे चौकटी फुल शर्ट, फुल पॅन्ट, उंची पाच फूट दोन इंच, रंग सावळा, बांधा मध्यम ,चेहरा उभट अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी केले आहे .

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ग्रामपंचायत वतीने कृषी अभ्यास दौरा संपन्न. कृषी निगडित गावांना दिल्या भेटी. नांदगाव प्रतिनिधी         ग्रामपंचायत नांदगाव च्या वतीने कृषी अभ्यास दौरा काढण्यात आला होता.या अभ्यास दौऱ्याचे नियोजन 15 वित्त आयोगातून करण्यात आले होते या दौऱ्याच्या नियोजनानुसार कृषी विज्ञान केंद्र मुळदे येथे भेट देण्यात आली  तिथे विविध प्रकारची झाडे तसेच शोभिवंत मत्स्यपालन आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन विषयी माहिती घेण्यात आली.             मुळदे कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक श्री नाईक सर यांनी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना माहिती दिली मसाल्याच्या पदार्थातील जायफळ सुद्धा आपल्याकडे कोकणात चांगल्या प्रकारे होऊ शकते याची त्यांनी माहिती दिली आणि जायफळ या फळाचे जायफळ व्यतिरिक्त जायफळाला चिकटून असलेला आवरण जायपत्री म्हणून मसाल्याचे पदार्थात वापरता येतं त्याचबरोबर त्याच्या बाहेरील आवरण त्याचं लोणचं पण करता येतं अशा प्रकारे या झाडाचे पूर्ण फळ वापरात येतं अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर मत्स्यपालनाविषयी प्राध्यापक सहस्त्रबुद्धे यांनीही चांगल्या प्रकारे माहिती दिली. निळेली पशु पैदास केंद्र येथे भेट देण्या

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे आज स्थानिक कलाकारांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा  नवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजन  नांदगाव प्रतिनिधी  नांदगाव वरची वाडी येथील श्री देव रवळनाथ, श्री पूर्वाई देवी, श्री दिर्बाई देवी ,मुळ आकार - श्री गणेश गणेश मंदिर नवरात्र उत्सव समिती च्या वतीने नवरात्र उत्सव निमित्ताने  आज  गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठीक 9.30 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही तेथील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.