सिंधुदुर्ग today



मुंबई एकता कल्चरच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

सिंधुदुर्गच्या कवयित्री आर्या बागवे, युएसए मधील कवयित्री पल्लवी शिंदे माने प्रथम

मुंबई येथील कवयित्री संगीता आडे द्वितीय तर साताऱ्याचे कवी संतोष येळवे तृतीय

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

          एकता कल्चर अकादमी मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये ओरोस सिंधुदुर्ग येथील कवयित्री आर्या बागवे आणि युएसए - अमेरिका येथील कवयित्री पल्लवी शिंदे माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर मुंबई येथील कवयित्री संगीता आडे यांनी द्वितीय आणि सातारा येथील कवी संतोष येळवे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवी अजय कांडर यांनी काम पाहिले असल्याची माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली.

        सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम पारितोषिक (विभागून ) कवयित्री आर्या बागवे आरोस , कुडाळ कविता -सरोगेट आईचा पान्हा आणि कवयित्री पल्लवी शिंदे माने - यूएसए - कविता - कथा, द्वितीय पारितोषिक - कवयित्री संगीता आडे -मुंबई वरळी - कविता - अदृश्य होत जाणार्‍या गावची गोष्ट, तृतीय पारितोषक कवी संतोष येळवे, सातारा - कविता - भैरवी - विशेष उत्तेजनार्थ - दिपाली साळवी ,अंधेरी . -माझा बाप नितेश पाटील , पालघर - गीते नभाने लिहिली,लीना एकबोटे ,विलेपार्ले -व्यथा निकेत नरहरी ,मुंबई -तो म्हणाला

मीनल कांबळे ,गिरगाव - नाती दीपक करगुटकर ,भायखळा -विश्वास गणपत चव्हाण , दहिसर -द्रोपती. 

    18 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव येथे एकता कल्चरच्या वार्षिक एकता कल्चर महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात सदर पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याचेही श्री जाधव यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today