सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे अयोध्या प्रभू श्री राम मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा होणार साजरा.
११जानेवारी ला (पौष शुक्ल द्वादशी) ला सर्व ठिकाणी होणार कार्यक्रम
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त कणकवली तालुक्यातील नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम पुढील प्रमाणे - सकाळी ९.३० वा. नांदगाव तिठा येथून रॅलीची सुरुवात, सकाळी १० वा मोरयेवाडी श्री राम मंदिर (आरती ), सकाळी १०.३० वा. नांदगाव गोसावी -कुभांरवाडी श्री राम मंदिर (आरती ), ११.३० वा. बोभाटेवाडी हनुमान मंदिर (आरती ),१२.१५ वा. नांदगाव तिठा येथे रथातील श्रीरामांची पूजा व आरती , दुपारी १ ते ३ नांदगाव तिठा येथे महाप्रसाद असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व श्रीराम भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा