सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे अयोध्या प्रभू श्री राम मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा निमित्ताने भव्य रॅली 

जय श्री राम... प्रभु रामचंद्र की जय... अशा घोषणांनी परिसर गेला दणाणून 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

जय श्री राम... जय जय श्रीराम .... प्रभु रामचंद्र की जय ... भारत माता की जय अशा विविध घोषणांनी नांदगाव परिसर दणाणून नेत नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्त यांनी भव्य रॅलीला सुरुवात केली .

         अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने भरगच्च कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाले आहे.  

     या भगव्या रॅलीमध्ये अहवाल वृद्धांपासून वेशभूषा बनविण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांचे आजचे डिझेलच्या तालावर सदर भव्य रॅली नांदगाव परिसरामध्ये काढण्यात आली.रॅली सकाळी १० वा. नांदगाव तिठा येथे श्री राम मुर्तीची विधिवत पूजा करुन रॅलीला सुरुवात झाली . नांदगाव तिठा येथून मोरयेवाडी राम मंदिर येथे भव्य रॅली जात त्या ठिकाणी आरती करण्यात आली. तसेच तेथून नांदगाव गोसावी -कुभांरवाडी राम मंदिर येथे जात आरती करण्यात आली .  बोभाटेवाडी हनुमान मंदिर येथे जात आरती करण्यात आली व पुन्हा नांदगाव तिठा येथे रथातील श्रीरामांची पुजा व महाआरती करुन आलेल्या सर्व दशक्रोशीतील श्री राम भक्तांना महाप्रसाद संपन्न झाला. 

       यावेळी नांदगाव   दशक्रोशीतील बहुसंख्येने श्री राम भक्त उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today