सिंधुदुर्ग today

पावणा देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बावशी यांच्यातर्फे माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम.

श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशीत फुलणार भक्तीचा मळा 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील पावणा देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ बावशी गावठण यांच्यातर्फे माघी गणेश जयंती निमित्त श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशीत फुलणार भक्तीचा मळा फुलणार असून विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

         शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वा.पूजन , दुपारी १२.३० वा.आरती सायंकाळी ५ वा. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम , रात्री ८ वा. आरती , रात्री ९.३० वा. महाप्रसाद , शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी ९ वा. अभिषेक व पुजन, सकाळी १०.३० वा.होमहवन, दुपारी १२ वा. जन्म उत्सव व महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ वा. हळदीकुंकू , सायंकाळी ५ वा. पालखी मंदिर प्रदक्षिणा व दिंडी, सायंकाळी ७ वा. गा-हारणी व नवस फेडणे , रात्री  ८ वा. महाआरती, रात्री ८.३० वा. शरद मोचेमांडकर प्रस्तुत  जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आरोस यांचा नाट्य प्रयोग, रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, सकाळी ११ वा. अभिषेक व पुजन, दुपारी १२ ते २ महाप्रसाद, रात्री ८ वा. आरती अशा माघी गणेश जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today