सिंधुदुर्ग today
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R.) मोहिमेला सुरुवात. मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष मोहिम; कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर) मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘Special Intensive Revision (SIR)’ या विशेष मोहिमेची सुरूवात 1 एप्रिल 2026 होत आहे. नव्या मतदारांची नोंदणी, अपात्र नोंदी वगळणे तसेच स्थलांतरित नागरिकांची माहिती अद्ययावत करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या मोहिमेमध्ये नेमून देण्यात आलेले काम सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने पूर्ण करावीत. कामामध्ये हयगय केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल पासून विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R.) मोहिम सुरू झाली आहे. या अनुषंगाने कुडाळ येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण व आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या...