पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकणच्या जलप्रवासाचे  नवे पर्व सुरू  मुंबई-विजयदुर्ग 'रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा -मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला चालना -कोकण–मुंबई दुवा होणार अधिक मजबूत; जलसेवेतून विकासाचा महामार्ग -सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार मुंबई,: प्रतिनिधी  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून केलेल्या आणि  मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा आज मोठ्या उत्साहात  शुभारंभ सोहळा संपन्न झाला.मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवपूजा करून भाऊचा धक्का, मुंबई येथून या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली. पहिल्या फेरीला मुंबईकर चाकरमानी व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव मध्ये आठवडा बाजारात स्वच्छतेचा जागर तिठा परिसर केला स्वच्छ नांदगाव : प्रतिनिधी  नांदगाव ग्रामपंचायत च्या सहकार्याने आणि स्वच्छता मिशन,सिंधुदुर्ग च्यावतीने नांदगाव तिठ्ठा बाजारपेठ येथे रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  स्थानिकांसह,लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, रिक्षा संघटना पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.नांदगाव तिठ्ठा परीसराची स्वच्छता करीत सर्वांना स्वच्छता संदेश देणारी पत्रके वाटप करीत स्वच्छेचे महत्त्व पटवून देण्यात आले.  सुरुवातीला मिशन सिंधुदुर्ग चे मुख्य स्वच्छता दूत  पत्रकार गणेश जेठे यांनी प्रास्ताविक करताना स्वच्छता मिशन चे काम सांगितले.त्याशिवाय स्वच्छता मोहीम का राबवली जाते याची माहिती दिली.राष्ट्रगीताने स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळेस जि.प.सदस्य संतोष पारकर,पं.स.सदस्य हर्षदा वाळके,सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र सावंत, माजी जि.प.सभापती नागेश मोरये,माजी सरपंच पंढरीनाथ वायंगणकर,वैभववाडी नायब तहसीलदार दिलिप पाटील,वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके,प्रा.विनायक पाताडे,नांदगा...