सिंधुदुर्ग today
तालुकास्तरीय बाल कला क्रिडा महोत्सव मध्ये नांदगाव उर्दू मुली कबड्डी स्पर्धेत प्रथम.
जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव साठी निवड.
सरस्वती हाय.नांदगाव येथे करण्यात आला गुणगौरव.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुकास्तरीय शालेय बालकला क्रीडा महोत्सव व ज्ञानी मी होणार महोत्सव नुकताच नॅशनल इंग्लिश स्कूल नडगीवे च्या पटांगणावर संपन्न झाला या तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव मध्ये नांदगाव प्राथमिक शाळा उर्दू या प्रशालेने मुली गट कबड्डी तालुका मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर याच प्रशालेतील आलिया खान 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हा स्तरावरील बाल कला क्रिडा महोत्सव साठी निवड झाली असल्याने या प्रशालेतील या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकाविलेल्या या प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे स्नेहसंमेलन निमित्त मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा