सिंधुदुर्ग today



चौथे संस्कृती साहित्य संमेलन ५ जानेवारी रोजी इचलकरंजीत

संमेलनाध्यक्ष कादंबरीकार कृष्णात खोत तर कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ.योगिता राजकर

कादंबरीकार विठ्ठल खिल्लारी, कवी सफरअली इसफ, कथाकार हंसराज जाधव यांना पुरस्कार

संस्थाध्यक्ष महावीर कांबळे, सचिव अनुराधा काळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे यांची माहिती

इचलकरंजी/प्रतिनिधी

        इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे चौथे साहित्य संस्कृती संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२५  रोजी सायं. ४ वा. इचलकरंजी भोने माळ सरस्वती हायस्कूलच्या सुभद्रादेवी माने सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर प्रसिद्ध कवयित्री डॉ.योगिता राजकर (वाई) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन रंगणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे आणि कार्यवाह अनुराधा काळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे यांनी दिली.

      संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजीतर्फे दरवर्षी संस्कृती साहित्य संमेलन आयोजित केले जाते. मराठीतील मान्यवर साहित्यिकांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या जात असलेल्या या संमेलनाचे आजवर अध्यक्षस्थान नामवंत साहित्यिकांनी भूषविले. यात कवी अजय कांडर,समीक्षक प्राचार्य गोविंद काजरेकर, कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांचा समावेश आहे. तर यावर्षी अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कृष्णात खोत हे मराठीतील आजचे आघाडीचे कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या 'रिगाण' या कादंबरीने स्वतःचा वाचक वर्ग निर्माण केला. खोत यांचे लेखन अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आले असून त्यांना अनेक मान्यवर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

   इचलकरंजी पोलीस उपअधीक्षक अमरसिंह साळवे स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे उद्घघाटन दगडूलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी शामसुंदर मर्दा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष उपस्थित म्हणून मराठीतील प्रसिद्ध कवी तथा संस्कृती प्रतिष्ठांचे सल्लागार अजय कांडर, सुप्रसिद्ध सांस्कृतिक कार्यकर्ते - कवी मधुकर मातोंडकर, इचलकरंजी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सतीश पाटील, काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अमरसिंह माने, नालंदा स्पर्धा परीक्षा केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमर कांबळे, काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्टचे सेक्रेटरी शिवाजी जगताप, संविधान परिवारचे सुनील स्वामी, नारायण सुर्वे कवी मंचचे अध्यक्ष शैलेश खुडे, संमेलनाला अर्थ सहयोग देणारे सुषमा कोठावळे आणि राजाराम कोठावळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

    यावेळी लक्ष्मण कांबळे ( जिंदा) स्मृती संस्कृती कादंबरी पुरस्कार कादंबरीकार विठ्ठल खिल्लारी यांना तर दगडूलाल मर्दा स्मृति संस्कृती कथा पुरस्कार हंसराज जाधव यांना आणि वसंत - कमल स्मृती संस्कृती काव्य पुरस्कार कवी सफरअली इसफ यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर यावेळी लेखक अशोक पवार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तर शेवटच्या सत्रात नामवंत कवयित्री प्रा.डॉ. योगिता राजकर  यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात कविता वाचनासाठी स्वप्नाली ढोणूषे, प्रियंका भाटले, महेश सटाले, कुमुदिनी मधाळे, संगीता पाटील, दिनकर खाडे, जीवन बरगे, राहुल राजापुरे आदी कवींना निमंत्रित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today