सिंधुदुर्ग today
सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात सुरू
पंचक्रोशीतील सरपंच व पोलीस पाटील यांचा करण्यात आला सन्मान
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था सरस्वती हायस्कूल नांदगाव माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच व पोलीस पाटील यांचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे.
यावेळी रांगोळी स्पर्धा संपन्न झाली तर दुपार नंतर महिलांसाठी हळदीकुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.
यावेळी नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था चेअरमन नागेश मोरये, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, अँड दिपक अंधारी, पंढरी वायंगणकर, सुनील आंबेरकर, श्रीधर मोरये, खजिनदार सुभाष बिडये, ओटव सरपंच ऋहिता तांबे , व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, तिवरे सरपंच भाई आंबिलकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, असलदे पोलीस पाटील सावित्री पाताडे,तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये, बावशी पोलीस पाटील समिर मयेकर, ओटव पोलीस पाटील मंगेश तांबे, मठ खुर्द पोलीस पाटील विजय सावंत ,शाळेचे मुख्याध्यापक सुधीर तांबे, पालक संघाचे मारुती मोरये, पत्रकार ऋषिकेश मोरजकर,शांताराम जंगले , रविंद्र मर्ये ,सरवणकर कमलाकर महाडिक,ग्रामपंचायत सदस्य जैबा नावलेकर, दिक्षा जाधव, सरवणकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सावंत सर यांनी मानले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा