सिंधुदुर्ग today
नांदगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ब्राम्हणदेव बोभाटेवाडी प्रथम क्रमांक
आराधना नांदगाव उपविजेता
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कोळंबा क्रिकेट क्लब आयोजित नांदगाव प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धेत तोंडवली ब्राम्हणदेव बोभाटेवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर आराधना नांदगाव उपविजेता ठरला आहे.
सदर पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,हनुमंत वाळके ,विश्वनाथ चव्हाण शंकर मोरये ,जैबाब नावळेकर राजू तांबे , सिद्धार्थ तांबे राजेश माळवदे आदी उपस्थित होते. आदी मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते.
या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजयी संघाला प्रथम क्रमांक २१,०००/- सरपंच भाई मोरजकर , तर आकर्षक चषक कै. दिगंबर सदाशिव बिडये यांच्या स्मरणार्थ डॉ संजय बाळा बिडये यांजकडून पुरस्कृत केले आहे.
तर व्दितीय पारितोषिक रोख रक्कम १४,०००/- राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिदजी नाईक यांसकडून तर व्दितीय चषक मयूरभाई शिंदे ,शिवाभाई ठाकूर ,विकि भाई भोसले व प्रवीण पाटील यांसकडून देण्यात आले आहे.
उत्कृष्ट फलंदाज केदार खोत, उत्कृष्ट गोलंदाज विनय तांबे ,मालिकावीर आकाश वायंगणकर यांनी सुयश संपादन केले आहे.
स्पर्धेसाठी कोळंबा क्रिकेट क्लब चे अध्यक्ष विजय मोरये भाई मोरये,निरज मोरये,केदार खोत,साहिल बिडये, स्वप्निल चव्हाण, तुषार वाळके, राकेश चव्हाण, नंदकुमार मोरये, विठ्ठल बिडये,निलेश मोरये, निलेश मोरये अमित मोरजकर, रिध्देश मोदी,दिपेश बिडये , राज पारकर, गुरु कोदे, आर्यन मोरये ,गौरेश मोरये ,ऋतिक चव्हाण,सिध्देश भाट ,शुभम बिडये, मिहीर पाटील, कमलेश मोदी अमोल पाटील सिद्धेश साळुंखे आदींनी परिश्रम घेतले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा