सिंधुदुर्ग today
श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मिळणार शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,४९,४४० शिधापत्रिका धारकांना मिळणार लाभ
सिंधुदुर्ग today (ऋषिकेश मोरजकर)
श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्या आदेशानुसार शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप केले जाणार आहे.
आनंदाचा शिध्याचे वाटप २२ जानेवारी ते २९ फेब्रुवारी दरम्यान होणार असून त्यासाठी रेशन कार्ड धारकांना १००/- रुपये द्यावे लागणार आहे. या आनंदाच्या शिधा मध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल, आणि अर्धा किलो प्रमाणे रवा, चणाडाळ, मैदा व पोहे अशा सहा वस्तूंचा समावेश असेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ४४० शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा