सिंधुदुर्ग today
नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने उद्या श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने महिलांसाठी खास आकर्षण "खेळ पैठणीचा"
कणकवली प्रतिनिधी
नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव यांच्या वतीने सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे या महापूजा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून यात महिलांसाठी खास आकर्षण खेळ पैठणीचा होम मिनिस्टर तसेच हळदीकुंकू समारंभ दुपारी ठीक 3 वा. आयोजित करण्यात आला आहे.
खेळ पैठणीचा होम मिनिस्टर मध्ये प्रथम विजेती आकर्षक पैठणी तसेच व्दितीय क्रमांक विजेती आकर्षक पैठणी देण्यात येणार आहे. खेळ पैठणीचा खेळताना बाद करण्यात येणार नसून जे गेम असतील त्या एकूण गुणांच्या आधारे प्रथम क्रमांक व व्दितीय क्रमांक घोषित करुन पारितोषिक देण्यात येणार आहे.तरी यासाठी महीलांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव च्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा