सिंधुदुर्ग today
नांदगाव केंद्र शाळा नं.१ येथे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन
शालेय मुलांचे विविध स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
नवनिर्वाचित केंद्र प्रमुख सद्बगुरू कुबल यांचा सत्कार
नांदगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदगाव नंबर एक या प्रशालेत आज शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन शिक्षक सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळा संपन्न झाला आहे.
यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मोमिना पाटणकर, नांदगाव पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल, केंद्र शाळा मुख्याध्यापक सुहास सावंत, सुभाष बिडये,भाई मोरये,केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ऋषिकेश मोरजकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, मारुती मोरये,सिफा नावलेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात गेल्या वर्षभरात जे विविध स्पर्धा संपन्न झाल्या त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
नांदगाव केंद्र बल गटाचे नवनिर्वाचित केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल यांचा सत्कार शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून नागेश मोरये यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कार्यक्रम प्रास्ताविक केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत तर सुत्रसंचालन व आभार श्री देसाई सर यांनी केले आहे.
उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेचच मुलांच्या गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला आहे यांनतर शालेय मुला-मुलींचा दशावतारी नाट्य प्रयोग "भीमाशंकर स्थापना" हा सादर होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा